वारीत तलवार चालते पण संविधानावर आक्षेप; आमदार रोहित पवारांचा हल्लाबोल

Rohit Pawar On Manisha Kayande : आषाढी वारीमध्ये अर्बन नक्षल घुसले असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कांयदे (Manisha Kayande) यांनी केला होता. विधान परिषदेत हरकतीचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी हा आरोप केला होता. तर आता आमदार मनिषा कायंदे यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (NCPSP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिला आहे. वारीमध्ये काही नेते तलवार घेऊन येतात त्यांना हे चालतात पण वारीमध्ये संविधान घेऊन आले तर आक्षेप घेतात अशी टीका आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना केली.
माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, काही दिवसांपासून विधिमंडळात आम्ही आमदार लोकशाहीच्या मार्गाने निवडून येतो. पण काही राजकीय नेत्यांना खुष करण्यासाठी एक वेगळा वातावरण निर्माण व्हावा जनसुरक्षा विधेयक लागू व्हावा म्हणुन काही आमदार पवित्र वारीला बदनाम करत असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता आमदार मनिषा कायंदे यांच्यावर केली आहे. तसेच हे सरकार संविधान आणि वारीच्या विरोधात आहे असं देखील रोहित पवार म्हणाले.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, काही नेते तलवार घेऊन वारीमध्ये येतात तेव्हा तुम्हाला आक्षेप घेता येत नाही पण संविधान घेऊन आलो तर तुम्ही आक्षेप घेतात. त्यामुळे वारीचा आणि वारकर्ऱ्यांचा अपमान करणारे जे आमदार असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील आमदार रोहित पवार यांनी यावेळी केली.
तर अर्बन नक्षलाचा आरोप करणाऱ्या आमदार आधी उद्धव ठाकरे यांच्यासोबत होत्या तेव्हा त्या एमएलसी होत्या पण त्यांची टर्म संपत आल्याने त्यांच्या मनात अचानक बदल झाला आणि मग शिंदे साहेबांसोबत गेले आणि परत एकदा आमदार झाल्या. पण आता भाजप शिंदेसाहेबांची ताकद कमी करत असल्याने ते आमदार भाजपला खुष करण्याता प्रयत्न करत आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो अशी टीका देखील आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांच्यावर केली.
लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवीगाळ
तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये प्रत्येक गोष्टीला घेऊन चढाओढ आहे. पण अजितदाद पंढरपुरला का गेले नाही हा प्रश्न आहे. ही चढाओड नशिकला होणाऱ्या महाकुंभमध्ये पण पहायला मिळेल. सरकार फक्त एकमेकांची जिरवण्याचा काम करत आहे. असं रोहित पवार म्हणाले.