दोन्ही पवार एकत्र येणार? 10 जूनला होणार महत्त्वाचा निर्णय, रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

दोन्ही पवार एकत्र येणार? 10 जूनला होणार महत्त्वाचा निर्णय, रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

Sharad and Ajit Pawar come together decision will on June 10, what exactly did Rohit Pawar say : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूंकप होणार असल्याचे संकेत शरद पवारांनी (Sharad Pawar) काही दिवसांपूर्वी दिले होते. आमच्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत, त्यातील एका गटाला अजित पवारांसोबत (Ajit Pawar) जावं वाटतं, असं विधान पवारांनी केलं होतं. तेव्हापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्टचं सांगितलं आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

आमदार रोहित पवार हे माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, याबाबत आमच्या कमिटीमध्ये किंवा शरद पवार यांच्यासोबत देखील यावर काहीही चर्चा झालेली नाही. तसेच सुप्रिया सुळेंशीदेखील यावर काहीही बोलण झालेलं नाही.

MSP मध्ये वाढ, कर्जमाफी अन्…, केंद्रीय मंत्रिमंडळाचे शेतकऱ्यांसाठी 2 मोठे निर्णय

त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार किंवा काही वेगळा निर्णय घ्यायचा अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे मला यावर स्पष्ट काही बोलता येणार नाही. पण 10 जूनच्या अगोदर पक्षामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारच्या पुर्नरचना केल्या जाणार आहेत. त्यानंतर नव्या पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली जातील. असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवारांनी नुकतीच इंडियन एक्स्प्रेसला एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत बोलताना पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. याच मुलाखतीत पवारांनी आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन मतप्रवाह असल्याचं विधान केलं. एका गटाला वाटतं की आम्ही एकत्र यावं, अजित पवारांसोबत जावं असं वाटतं. तर दुसऱ्या गटाला वाटतं की, अजितदादांसोबत जाऊ नये, असं पवार म्हणाले. इतकंच नाही तर संसदेमध्ये सत्ताधारी पक्षासोबत बसायचं की, विरोधी पक्षासोबत बसायचं यांचा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यावा, असं सूचक वक्तव्यही पवारांनी केलं. पवारांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.जनतेला मोदींना पर्याय हवा आहे, पण विरोधक तो देऊ शकलेले नाहीत, असंही म्हणत पवारांनी एक प्रकारे इंडिया आघाडीच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उभा केला. दरम्यान, शरद पवारांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे वारे सुरू झाल्याच्या चर्चा रंगल्यात.

नाशकात ठाकरेंना आणखी एक धक्का, माजी आमदारासह पदाधिकाऱ्यांचा गोतावळा शिंदेसेनेत

यापूर्वी विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शरद पवारांच्या अनेक आमदारांनी अजित पवारांसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच अनेकदा अनेक कार्यक्रमात दोन्ही पवार एकत्र आल्याचंही पाहायला मिळालं होतं. काही वेळाला त्यांच्यात गुप्त बैठकाही झाल्या होत्या. या भेटी एकप्रकारे राजकीय जवळीक वाढवण्याचे संकेत देतात.अशातच पक्षातल्या एका गटाला अजितदादांसोबत जावं असं वाटतं असं विधान पवारांनी केलं. त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अशी चर्चा सध्या सुरू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube