Ashutosh Kale : कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी मिळावा यासाठी आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांचे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्या पाठपुराव्यातून मतदार संघातील विविध रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेतून 3.50 कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती आज कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव (Kopargaon) मतदार संघाच्या खराब झालेल्या सर्वच रस्त्यांसाठी जास्तीत जास्त निधी मिळावा या मागणीसाठी आमदार आशुतोष काळे पाठपुरावा करत होते. नुकतंच त्यांना मतदारसंघातील रस्ते व पुलांसाठी तब्बल 700 कोटी निधी मिळविण्यात यश आला आहे. या निधीमुळे कोपरगावच्या रस्ते विकासाचा अनुशेष भरून निघण्यास मोठी मदत झाली आहे.
कोपरगावच्या प्रत्येक खराब रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी आमदार काळे यांचा सततचा पाठ्पुरावा असल्यामुळे या पाठपुराव्यातून शहरातील विविध महत्वाच्या रस्त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेतून 3.50 कोटींचा निधी मिळाला आहे. यामध्ये कोपरगाव मतदार संघातील मौजे वारी-बापतरा (इजिमा 01) या रस्त्यासाठी 50 लक्ष, सावळगाव राधु पाटील उकिरडे घर ते राजेंद्र वाळूंज घर रस्ता करणे 50 लक्ष व कोकमठाण येथील इंटरनॅशनल स्कूल ते प्र.रा.मा.08 ला मिळणाऱ्या रस्त्यासाठी 50 लक्ष, एमडीआर 08 ते बक्तरपूर गावापर्यंत रस्ता करणे 40 लक्ष, ओगदी ते उंदीरवाडी तालुका हद्द रस्ता (ग्रा.मा.70) 40 लक्ष, काळे वस्ती ते कोळपेवाडी रस्ता (ग्रा.मा.21) 40 लक्ष, मनेगाव ते तळेगाव रस्ता (ग्रा.मा.63 ) 40 लक्ष, कोकमठाण ते माळवाडी प्ररामा 08 ला जोडणारा रस्ता (ग्रा.मा.68) 40 लक्ष, असा एकूण 3.50 कोटीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
Supriya Sule : बारामतीचं तिकीट कुणाला? सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडीत…
त्यामुळे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच या रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रकिया पूर्ण होऊन रस्त्यांची कामे सुरु होणार आहे. त्यामुळे नागरिकांना खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या त्रासातून मुक्तत्ता होणार असून नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.