Download App

MLA Disqualification Case : शिंदेंचीच शिवसेना खरी; नार्वेकरांकडून ठाकरेंना धक्का देत शिक्कामोर्तब

  • Written By: Last Updated:

MLA Disqualification Case Result Live Update : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा (Shiv Sena MLA Disqualification Case) निकाल आज (दि.10) अखेर निकाल लागला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी हा निकाल वाचून दाखवला. हा उद्धव ठाकरेंच्या विरोधात तर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. त्यावर आता शिंदे गटाकडून आनंदाच्या तर ठाकरे गटाकडून नाराजीच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिंदेंच्या बंडानंतर सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर आज काहीसा पडदा पडला आहे. आजच्या निकालाचे प्रत्येक अपडेट देणारा लेट्सअपचा विशेष ब्लॉग….

LIVE NEWS & UPDATES

  • 10 Jan 2024 07:38 PM (IST)

    पक्ष कुणाची खासगी मालमत्ता नसते - मुख्यमंत्री

    शिवसेनेच्या आमदार अपात्रता निकाल वाचनामध्ये निर्णय हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पक्ष कुणाची खासगी मालमत्ता नसते. या निकालामुळे घराणेशाही मोडीत निघाली. लोकशाहीमध्ये पक्षप्रमुखाने चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्या विरोधात पक्षातील लोकांना आवाज उठवण्याचा अधिकार आहे.

  • 10 Jan 2024 07:28 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालयातच ठाकरेंना न्याय मिळेल - शरद पवार

    शिवसेनेच्या आमदार अपात्रता निकाल वाचनामध्ये निर्णय हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. मात्र यामध्ये ठाकरे गटाला देखील अपात्रतेबाबत काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यावर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यावर शरद पवार म्हणाले की, नार्वेकरांनी निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्सचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयातच न्याय मिळेल. कारण बाळासाहेबांनी शिवसेना उद्धवला दिली होती. त्यामुळे ती शिंदेंना मिळू शकत नाही. तर हा निकाल म्हणजे न्यायालयीन नाही. तर राजकीय विचारांचा आहे. असं पवार म्हणाले.

  • 10 Jan 2024 07:23 PM (IST)

    देशाच्या लोकशाहीसाठी घातक निर्णय; सर्वोच्च न्यायालयात जाणार

    शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर आता राजकारणासह विधिज्ञांकडून प्रतिक्रिया येत आहेत. त्यात ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी म्हटलं आहे की, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय हा देशाच्या लोकशाहीसाठी घातक निर्णय आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार

  • 10 Jan 2024 07:11 PM (IST)

    बाळासाहेबांची शिवसेना इतिहासजमा- संजय राऊत

    शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की, हा निर्णय म्हणजे मॅच फिक्सिंग आहे. तसेच बाळासाहेबांची शिवसेना भाजपला संपवायची आहे. त्यांचं हेच षडयंत्र होतं. पण निवडणुका घ्या खरी शिवसेना कळेल. तसेच विधानसभा अध्यक्ष किती खोटारडेपणाने वागले आहेत. हे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊन सिद्ध करू अशी प्रतिक्रीया राऊत यांनी दिली.

  • 10 Jan 2024 06:59 PM (IST)

    अध्यक्षांनी सकाळी दिलेल्या माहितीप्रमाणे सर्वांना न्याय...

    महाराष्ट्रासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा (Shiv Sena MLA Disqualification Case) निकाल आज (दि.10) अखेर निकाल लागला आहे. दोन्ही गटाच्या अपात्रतेच्या याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे 40 आणि ठाकरे गटाचे 14 आमदार पात्र कोणीच अपात्र नाही. असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांनी सकाळी सांगितल्या प्रमाणे सर्वांना न्याय दिला आहे.

  • 10 Jan 2024 06:51 PM (IST)

    वेळ लागला तरी सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळणारच - आनंद दुबे

    शिवसेनेच्या आमदार अपात्रता निकाल हा उद्धव ठाकरेंच्या विरोधात तर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. त्यावर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यामध्ये शिवसेना उबाठा प्रवक्ते आनंद दुबे यांनी प्रतिक्रिया दिली की, आणखी एक वेळा सिद्ध झालं की पॉवर और पैसा संविधानाच्या डोक्यावर बसतोय. राहुल नार्वेकरांना न्याय करण्याचे निर्देश केले होते. पण त्यांनी आमच्यावर अन्यायच केला आहे. आमच्याकडे फक्त सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग आहे. वेळ लागला तरी न्यायालयात आम्हाला न्याय मिळणारच भाजपा आणि शिंदेंनी आम्हाला विधानसभा अध्यक्षांसमोर हरवलं आहे. आम्ही निराश देखील नाही आणि नाउमेद देखील नाही.

  • 10 Jan 2024 06:48 PM (IST)

    शिंदेच्या बाजूने निकाल लागण्यात राष्ट्रीय कार्यकारिणी महत्त्वाची ठरली - उज्वल निकम

    राज्यातील महत्त्वाच्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा आज अखेर निकाल लागला आहे. हा निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला आहे. त्यावर आता राजकारणासह विधिज्ञांकडून प्रतिक्रिया येत आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम म्हणाले की, २२ जून २०२२ ला शिवसेनेमध्ये फूट पडली. शिवसेनेतील ५५ आमदारांपैकी ३८ आमदारांचा एकनाथ शिंदेना पाठिंबा होता. आजच्या सुनावणीमध्ये अध्यक्षांनी प्राथमिक मुद्दा सांगितला की, शिवसेना कोणाची? हा मुद्दा ठरवताना त्यांनी अनेक गोष्टींचा विचार केला. पहिली गोष्ट त्यांनी विचार केला की, पक्षाचे लीडरशीप स्ट्रक्चर काय आहे ? आणि दुसरा मुद्दा शिवसेना पक्षाची घटना काय व बहुमत कोणाचे?

    तर हा निर्णय घेताना अध्यक्षांनी स्पष्ट केले की, निवडणूक आयोगाच्या पटलावरील २०१८ च्या घटनेमध्ये काही बदल करण्याच आले होते. या घटनेतील बदल निवडणूक आयोगाने स्विकारले नव्हते,त्यामुळे २०१८च्या आधीची घटना अध्यक्षांनी ग्राह्य धरली आहे. पक्षप्रमुख या पदाबद्दल उल्लेख करताना अध्यक्षांनी स्पष्ट केले की राष्ट्रीय कार्यकारिणी ही महत्त्वाची आहे. २०२२ ला शिंदे गटाचे प्राबल्य विधी मंडळाच्या रेकॉर्ड प्रमाणे होते त्यामुळे शिवसेना हा अधिकृत पक्ष शिंदे गटाकडे आहे.

  • 10 Jan 2024 06:44 PM (IST)

    ठाकरे गटाला निर्णय मान्य नाही, पुढील लढाई कायदेशीर पद्धतीने लढणार

    शिवसेनेच्या आमदार अपात्रता निकाल हा उद्धव ठाकरेंच्या विरोधात तर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. त्यावर ठाकरे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हा निकाल आम्हाला मान्य नाही. या पुढील लढाई आम्ही कायदेशीर पद्धतीने लढू.

  • 10 Jan 2024 06:39 PM (IST)

    आव्हाड म्हणाले, यह तो होना ही था...

    शिवसेनेच्या आमदार अपात्रता निकाल वाचनामध्ये निर्णय हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. त्यावर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत त्यात राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'यह तो होना ही था …… #ठाकरे न्यायाची अपेक्षा कोणा कडून करता.. जनता न्याय करेल.'

  • 10 Jan 2024 06:35 PM (IST)

    नार्वेकरांच्या निकालाचा आगामी लोकसभेत आम्हाला फायदा

    शिवसेनेच्या आमदार अपात्रता निकाल वाचनामध्ये आतापर्यंत निर्णय हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. त्यावर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत त्यात 'एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांचा गट हीच खरी शिवसेना पक्ष असल्याचा निर्णय नार्वेकरांनी दिला आहे. नार्वेकरांनी दिलेला हा निकाल उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हाला फायदा होईल. असं रिपब्लिकचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हटले आहेत.

follow us