विधानसभेत सायबर फसवणुकीचा मुद्दा गाजला…आमदार दातेंच्या लक्षवेधीला मुख्यमंत्री फडणवीसांचे उत्तर

MLA Kashinath Date : राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत विधानसभेत आमदार काशिनाथ दाते यांनी उपस्थित

MLA Kashinath Date

MLA Kashinath Date

MLA Kashinath Date : राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत विधानसभेत आमदार काशिनाथ दाते यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीमुळे हा गंभीर विषय पुन्हा ऐरणीवर आला. नागरिकांच्या मेहनतीची कोट्यवधी रुपयांची रक्कम ऑनलाइन फसवणुकीत लुटली जात असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देत आमदार दाते यांनी सरकारकडून ठोस उपाययोजनांची मागणी केली.

या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकार सायबर गुन्ह्यांविरोधात आक्रमकपणे कारवाई करत असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ ते मे २०२६ या कालावधीत राज्यात सायबर आर्थिक फसवणुकीचे १० हजार ५०५ गुन्हे नोंदविण्यात आले असून २ हजार ३७९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष सायबर यंत्रणा कार्यरत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

आमदार काशिनाथ दाते (MLA Kashinath Date) यांनी विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यात वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. जिल्ह्यात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत असल्याचे सांगत पीडितांना त्वरित न्याय मिळावा, फसवणुकीतील रक्कम परत मिळविण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी व्हावी आणि तपास जलदगतीने पूर्ण व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात ५ हजार १४१ तक्रारी प्राप्त झाल्या असून अनेक प्रकरणांमध्ये फसवणुकीतील रक्कम गोठविण्यात प्रशासनाला यश आले आहे. याशिवाय कोपरगाव येथे डिजिटल अटकेची भीती दाखवून करण्यात आलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली.

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्यभर सायबर लॅब, विशेष सायबर पोलीस ठाणे, डिजिटल फॉरेन्सिक सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि व्यापक जनजागृती मोहिमा राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. नागरिकांनी फसवणुकीची घटना लक्षात येताच तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधल्यास किंवा तक्रार नोंदवल्यास फसवणुकीतील रक्कम गोठविण्याची शक्यता अधिक वाढते, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार दाते यांनी शासनाने सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र आणि अधिक सक्षम यंत्रणा उभारावी, जिल्हास्तरावर सायबर पोलिसांची क्षमता वाढवावी तसेच फसवणुकीतील रक्कम पीडितांना जलद परत मिळण्यासाठी प्रभावी प्रणाली विकसित करावी, अशी मागणी सभागृहात केली.

वर दोन गुजराती बसले आहेत तर… व्यापारी लोक आहात व्यापार करा ; जैन समाजाच्या शिष्टमंडळाला राज ठाकरेंचा इशारा-

-जानेवारी २०२५ ते मे २०२६ दरम्यान राज्यात १०,५०५ सायबर आर्थिक गुन्ह्यांची नोंद.
– २,३७९ आरोपींना अटक.
– अहिल्यानगर जिल्ह्यात ५,१४१ तक्रारी प्राप्त.
-कोपरगाव डिजिटल अटक फसवणूक प्रकरणात दोषारोपपत्र दाखल.
– सायबर लॅब, विशेष पोलीस ठाणे आणि जनजागृती मोहिमा अधिक बळकट.
– सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० हेल्पलाइनवर संपर्क करण्याचे आवाहन.

Exit mobile version