MLA Nilesh Rane : भाजप नेत्यांच्या कारमध्ये दीड लाख आढळताच निलेश राणे थेट पोलीस ठाण्यात अन्…

MLA Nilesh Rane : मालवण नगरपरिषद निवडणुकीत भाजपविरुद्ध शिवसेना शिंदे गटमध्ये मुख्य लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान

MLA Nilesh Rane

MLA Nilesh Rane

MLA Nilesh Rane : मालवण नगरपरिषद निवडणुकीत भाजपविरुद्ध शिवसेना शिंदे गटमध्ये मुख्य लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत होते. आमदार निलेश राणे यांनी भाजपवर पैसे वाटण्याचा आरोप करत मालवणमध्ये भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब व देवगड तालुकाध्यक्ष महेश नारकर व कृष्णकांत आडिवरेकर पैसे वाटप करत असल्याचा दावा केला आहे.

देवगड तालुकाध्यक्ष यांच्या वाहनामध्ये 1,50,000 ची रोकड आढळून आली असल्याचा दावा आमदार निलेश राणे (MLA Nilesh Rane) यांनी केला आहे. तर आता या प्रकरणात मालवण पोलीस ठाण्यात (Malvan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आमदार निलेश राणे यांनी मालवण पोलीस ठाण्यात भेट देत या प्रकरणाचा पुढील तपास कोणत्या पद्धतीने सुरु असल्याची सविस्तर माहिती घेतली.

यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्याशी चर्चा करून तपासाची सद्यस्थिती जाणून घेतली तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष राहावी यासाठी आवश्यक सूचना दिल्या.

नेमकं प्रकरण काय?

निवडणूक प्रचार संपल्यानंतर पोलिसांच्या नाकाबंदी वेळी देवगड भाजप तालुका अध्यक्ष महेश यांच्या कारमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली होती. यानंतर या प्रकरणात तपास करण्यासाठी मालवण पोलिसांनी सदर वाहन पोलीस ठाण्यात आणली होती मात्र त्याच वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब आणि अजिंक्य पाताडे यांनी नंबर प्लेट नसलेली कार घेऊन पोलीस ठाण्यात पोहचले मात्र या प्रकरणात भाजप नेते हस्तक्षेप करत असल्याची माहिती आमदार निलेश राणे यांनी मिळताच ते मालवण पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.

नगरपरिषद अन् नगरपंचायतीच्या निकालावर आज होणार फैसला, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

या प्रकरणात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा निलेश राणे यांनी दिल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version