Download App

पारनेरचा आमदार शिवसेनेचा होणार…, पठारेंनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले!

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणूक संपूर्ण ताकतीनिशी लढवणार असून पारनेर (Parner) तालुक्याचा पुढील आमदार हा शिवसेनेचाच होणार

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणूक संपूर्ण ताकतीनिशी लढवणार असून पारनेर (Parner) तालुक्याचा पुढील आमदार हा शिवसेनेचाच होणार असल्याचे म्हणत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे (Shrikant Pathare) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

तसेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीनंतर आपल्या मतदारसंघात घडत असलेल्या सर्वच राजकीय घडामोडी ज्ञात आहेत आणि त्यांचे बारीक लक्ष आपल्यावर आहे, त्यासाठी आपण सर्वांनी संपूर्ण ताकतीनिशी कामाला लागले पाहिजे असेही डॉ.श्रीकांत पठारे म्हणाले.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पारनेर तालुक्यातील बूथ प्रमुखांसह निवडक कार्यकर्त्यांची बैठक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने सुपा येथे आयोजित केली होती.

यावेळी डॉ.श्रीकांत पठारे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख अनिल शेटे, जेष्ठ नेते डॉ.भास्कर शिरोळे, महिलाआघाडी उपतालुकाप्रमुख डॉ.कोमल भंडारी, बाजार समिती संचालक बाबासाहेब नर्हे, शेतकरी सेना तालुकाप्रमुख किसन चौधरी, उपनगराध्यक्ष राजू शेख, विभागप्रमुख बाबासाहेब रेपाळे, संतोष येवले, संतोष साबळे, दिपक मावळे, कामगार सेना प्रमुख डी.के.पांढरे यांसह तालुक्यातील शिवसेनेचे सर्व बूथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना युवासेना तालुकाप्रमुख अनिल शेटे यांनी त्यांच्या आक्रमक शैलीत संबोधन केले, ते म्हणाले की पारनेरची जागा ही महाविकासआघाडीच्या जागा वाटपात शिवसेनेलाच असून शिवसेनेचाच आमदार करण्यासाठी सर्वांनी कामाला लागले पाहिजे आणि गावागावात वाड्यावस्त्यांवर जाऊन प्रचार सुरु केला पाहिजे. तसेच आपल्या पाठींब्यावर महाविकासआघाडीचा खासदार झालेला असून आता विधानसभेला आपण कुठेही कमी पडायचे नाही असेही शेटे यांनी कार्यकर्त्यांना संबोधन केले.

सरकारचा मोठा निर्णय, सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी डॉ. धनंजय सावळकर यांची नियुक्ती

जेष्ठ नेते डॉ.भास्कर शिरोळे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसंदर्भात सूचना केल्या व बूथ स्तरावर करावयाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. तसेच कोणीही कोणाच्या दबावाला बळी न पडता तन-मन-धन लावून काम करणार असल्याचा शब्द दिला. तालुक्यातील सर्वच बूथप्रमुखांनी केलेल्या तयारीचा यावेळी आढावा घेण्यात आला तसेच विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्वाच्या सूचना देण्यात आल्या.

follow us