पारनेरची जागा राष्ट्रवादी की शिवसेनेला…अंधारेंनी मंचावरूनच सांगून टाकल

पारनेरची जागा राष्ट्रवादी की शिवसेनेला…अंधारेंनी मंचावरूनच सांगून टाकल

Sushma Andhare : खासदार निलेश लंके यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सभा घेतल्या, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी नगर शहरात रॅली काढली. तसेच मी सुद्धा कर्जत-जामखेड भागात सभा घेतल्या व जिल्ह्यात महाविकास आघाडीचा धर्म पाळत निलेश लंके यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले.

निलेश लंके यांच्या विजयात शिवसैनिकांचा सिंहाचा वाटा आहे. महाविकास आघाडीच्या वरीष्ठ नेत्यांसोबत लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या बैठकीत पारनेरमध्ये मशाल पेटवू हा राष्ट्रवादीचा शब्द असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत पारनेरची जागा शिवसेनेला हवी आहे अशी मागणी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पारनेर येथे झालेल्या महाराष्ट्र अस्मिता मेळाव्यात केली.

या मेळाव्यात बोलताना पारनेरची जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेला मिळावी यासाठी मी जबाबदार नेता म्हणून आग्रही राहणार असं म्हणत त्यांनी जोरदार फटकेबाजी करून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीच्या बैठकीमध्ये सांगितले गेले होते. पारनेर मधून निलेश लंके आता पुढे चालले आहेत आणि ते लोकसभा लढणार आहेत. ते निवडून येतील आणि पारनेरची जागा रिकामी होईल मग काय करावं… तर पारनेरच्या जागेवर मशाल पेटवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीचे लोक मेहनत घेऊ असा शब्द त्यावेळी निलेश लंके यांनी शिवसैनिकांना दिला होता, त्यामुळे महाविकासआघाडीचा धर्म म्हणून तो शब्द त्यांनी पाळावा आणि मला खात्री आहे की ते सुद्धा शब्द पाळणारे आहेत असेही यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या.

पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, महाविकास आघाडीच्या जबाबदार पदाधिकारी आणि प्रवक्ता म्हणून अत्यंत जबाबदारीने आणि गांभीर्याने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती करते आणि जाहीरपणे या सभागृहातून सांगते, यावेळी पारनेरची जागा आम्हाला हवी आहे. लोकसभेदरम्यान आम्ही पारनेरमध्ये राष्ट्रवादीला खंबीर साथ दिली आणि आता शिवसेनेची मशाल तेवत ठेवण्यासाठी आम्हाला पारनेरची जागा हवी आहे.

मी लोकसभेदरम्यान भाऊ म्हणून नीलेश लंके यांच्यासाठी सभा घेतल्या. नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके माझ्या वहिनी आहेत. लोकसभेला नणंद प्रचारासाठी आली तशीच आता भावजय या नात्याने शिवसेनेच्या प्रचाराला राणी वहिणी येतील असा विश्वास व्यक्त करून अंधारे म्हणाल्या पारनेरची जागा शिवसेनेला मिळाल्यावर उमेदवार कोणीही असो ती निवडूण आणायचा आहे असे आवाहन उपस्थितांना केले. तसेच जर जिल्ह्यात शिवसेनेची मशाल धगधगती ठेवायची असेल तर त्यासाठी पारनेरची जागा महत्वाची आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तशी मागणी करणार असून, ती जागा आपण घेत आहोत, असे प्रतिपादन शिवसेनेच्या नेत्या व प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केले. तसेच लोकसभेदरम्यान पारनेरची जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे यावर चर्चा झाली होती. आता 18 सप्टेंबर रोजी पुन्हा जागावाटपाबाबत होणार आहे त्यावेळी पारनेरची जागा आपल्याकडे यावी यासाठी आग्रही राहू असेही यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या.

गद्दारांनी घात करून शिवसेनेत फुट पाडली मात्र तरीही हा जिल्हा उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबिरपणे उभा राहिला. संकटाच्या काळात आम्ही शिवसेना वाढवा अभियान राबविले. गद्यारांसोबत शिवसैनिक गेला नाही. तालुक्यातील शिवसेना अभेद्य राहिली.लोकसभेदरम्यान आम्ही निलेश लंके यांना खंबीर साथ दिली. त्यांच्या विजयात शिवसैनिकांचा मोलाचा वाटा आहे.

‘बेछूट आरोप करू नका नाहीतर …’, उज्ज्वल निकमांचा विजय वडेट्टीवारांना इशारा

लोकसभा निवडणूकीत निर्णय घेण्यास वेळ लागला असला तरी उध्दव ठाकरे यांच्या फोननंतर शिवसैनिक सक्रिय झाले. तर संजय राउत यांनी नगर येथे बैठकीत पारनेर मतदारसंघ शिवसेनेला मिळावा याची जबाबदारी घेतली आहे अशी माहिती डॉ. श्रीकांत पठारे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube