‘बेछूट आरोप करू नका नाहीतर …’, उज्ज्वल निकमांचा विजय वडेट्टीवारांना इशारा

‘बेछूट आरोप करू नका नाहीतर …’, उज्ज्वल निकमांचा विजय वडेट्टीवारांना इशारा

Ujjwal Nikam On Vijay Wadettiwar : बदलापूर अत्याचार प्रकरणात (Badlapur Case) राज्य सरकारने उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची वकील म्हणून नेमणूक केल्याने विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) आक्षेप घेत शिक्षण संस्था आणि वकील एकाच पक्षाशी संबंधित असल्याचा म्हटलं आहे. यावर आता उत्तर देत काँग्रेसचे (Congress) दिग्गज वकील अतिरेक्याची केस घेतात असा पलटवार उज्वल निकम यांनी केला आहे. आज ते माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी बोलताना उज्वल निकम म्हणाले की, विरोधी पक्ष नेत्यांना किती काळजी आहे हे दिसत आहे. जिभेला हाड नसते असे म्हणतात, पण बेताल आणि बेछूट आरोप करण्यासाठी हे प्रसिद्ध आहेत. करकरे यांचा मृत्यू 26/11 मध्ये दहशवादी कसाब आणि अबू इस्माईल यांच्या गोळीबारात झाला होता असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर देखील त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे हे विरोधी पक्ष नेते आहे परंतु आज ते अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करून याच्या मध्ये राजकारण आण्याचा प्रयत्न करत आहे हे दुर्देवी आहे. अशी टीका माध्यमांशी बोलताना उज्वल निकम यांनी विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर केली.

पुढे बोलताना उज्वल निकम म्हणाले की, त्यांच्या पक्षाचे दिग्गज वकील अतिरेक्यांचे वकील होतात. 1993 चा खटला मी चालवत होतो. तेव्हा त्यांच्या पक्षाचे नेते किती आटापिटा करत होते. कोणत्या अभिनेत्याला वाचवण्याचा प्रयत्न होत होता. माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहे त्यामुळे असे बेछूट आरोप करू नका असा इशारा देखील यावेळी निकमांनी दिला.

तसेच आरोपी कोणत्याही पक्षाचा असो त्याच्या विरोधात जर पुरावे असेल तर त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी प्रयत्न करेल अशी ग्वाही देखील यावेळी उज्ज्वल निकमांनी दिली.

काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार ?

बदलापूर अत्याचार प्रकरणात ट्विट करत विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले होते की, बदलापूर प्रकरण दाबण्यासाठी वकील म्हणून भाजपचे उज्वल निकम यांची नियुक्ती?, बदलापूर प्रकरणी उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

विधानसभेपूर्वी भाजपला मोठा धक्का, जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

ती शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित, त्याच पक्षाच्या सबंधित वकिलाला विशेष वकील म्हणून नेमणूक केली, ज्याने निवडणूक लढवली. उद्या हे प्रकरण दाबले गेले तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न ट्विट करत विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube