Badlapur : चिमुकलीच्या न्यायासाठी काँग्रेसचा थेट मंत्रालयात मोर्चा; पोलिसांनी रोखून धरलं…

Badlapur : चिमुकलीच्या न्यायासाठी काँग्रेसचा थेट मंत्रालयात मोर्चा; पोलिसांनी रोखून धरलं…

Badlapur : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ (Badlapur Rape Case) मुंबईतील मंत्रालयात आज काँग्रेसचा मोर्चा धडकलायं. या घटनेच्या निषेधार्थ काल बदलापुरकरांनी रेल्वे स्थानकावर तब्बल 11 तास चक्का जाम आंदोलन केलं. संबंधित आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी आंदोलकांनी केली. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलन निवळलं. बदलापुरकरांनंतर आज काँग्रेस नेत्यांनी या घटनेचा निषेध केलायं.

खेडकर प्रकरणानंतर सरकारला आली जाग; दिव्यांगांबाबतचा कठोर GR निघाला

या आंदोलानामध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सहभागी झाले होते. काँग्रेसकडून आंदोलनाची घोषणा करताच पोलिसांकडून मंत्रालय परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मोर्चा मंत्रालय परिसरात येताच पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखून धरलंय. यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.

बदलापुरातील नामांकित शाळेतील दोन चिमुरडींवरील अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर बदलापुरातील नागरिक कमालीचे संतापले होते. काल त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानक आणि संबंधित शाळेबाहेर जोरदार आंदोलन केले. काही वेळानंतर मात्र या आंदोलनांना हिंसक वळण लागले.

मोठी बातमी : शाळेतील प्रत्येकाचे पोलीस वेरिफिकेशन करा; बदलापूर घटनेनंतर सरकारचे आदेश

पोलिसांनी आंदोलकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतरही आंदोलकांनी ऐकलं नाही. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा मारा करण्यात आला. यानंतर चिडलेल्या आंदोलकांनी पोलिसांवरच दगडफेक केली. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी आरोपीने आणखीही काही लैंगिक शोषण व असेच कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यामुळे आरोपीची अधिक चौकशी करण्याची गरज आहे असा मुद्दा उपस्थित करत पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती पोलिसांनी केली. यानंतर न्यायालयाने पोलिसांची विनंती मान्य करत आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube