“आंदोलनाला राजकीय म्हणता लाजा वाटू द्या”; बदलापुरातील आंदोलनावरून जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल

“आंदोलनाला राजकीय म्हणता लाजा वाटू द्या”; बदलापुरातील आंदोलनावरून जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल

Manoj Jarange Criticized Government : बदलापुरातील नामांकित शाळेतील दोन चिमुरडींवरील अत्याचाराच्या (Badlapur Crime) घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारच्या कारभारावर प्रचंड टीका सुरू केली आहे. राज्य सरकारकडून या टीकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे. या घटनेनंतर बदलापुरात संतप्त नागरिकांनी जोरदार आंदोलन केलं. काही काळानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून आंदोलकांनीही जोरदार दगडफेक केली. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होतं. आंदोलनात बाहेरचे लोकच जास्त होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाचे काही नेते (Eknath Shinde) म्हणाले होते.

त्यांच्या या वक्तव्यावर आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला तुम्ही राजकीय म्हणता अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे असा घणाघात जरांगे पाटलांनी केला.

मनोज जरांगे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बदलापूर घटनेवर सत्ताधाऱ्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. जरांगे पाटील म्हणाले, गृहखातं चालवणारा माणूस सुद्धा दोषी आहे. त्याला फक्त स्वतःच कुटुंब दिसतं. बाकीच्या लोकांची त्याला काहीच वाटत नाही.

Badlapur : आंदोलक बदलापुरचे नाहीत, ही राजकीय स्टंटबाजीच; भाजप आमदाराने लावला शोध

प्रकरण काय?

बदलापूरमधील (Badlapur) एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी आंदोलकांनी काल सकाळी साडेसहा वाजता शाळेबाहेर आंदोलन सुरु केले आणि त्यानंतर सकाळी साडे दहाच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोको आंदोलन केले होते. या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत पांगवलं तसेच काही आंदोलकांची धरपकड देखील पोलिसांकडून करण्यात आली आहे. आज येथे तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे. कोणताही  गैरप्रकार घडू नये यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे राज्य सरकारने या प्रकरणात कारवाईची सुरुवात करत तीन पोलीस अधिकाऱ्यांना (Badlapur Police) या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याने निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाच्या पुढील तापासाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली असल्याची माहिती देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. एसआयटी स्थापन केल्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने होईल असे सांगण्यात आले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube