विधानसभेपूर्वी भाजपला मोठा धक्का, जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षाने तयारी देखील सुरू केली आहे. यातच भाजपला (BJP) एका मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर (Kolhapur) भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई (Rahul Desai) यांनी राजीनामा दिल्याने भाजपला कोल्हापूरमध्ये एक मोठा धक्का बसला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल देसाई भाजपच्या तिकीटवर राधानगरी भुदरगड (Radhanagari- Bhudargarh) विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. विधानसभेसाठी त्यांनी तयारी देखील सुरु केली होती मात्र त्यांना पक्षाकडून तिकीट मिळणार नसल्याची माहिती मिळताच त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. राधानगरी भुदरगड विधानसभा मतदार संघात राहुल देसाई शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे.
तर दुसरीकडे येत्या काही दिवसात कोल्हापूरमध्ये भाजपला आणखी एक मोठा धक्का बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माहितीनुसार, कागल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) देखील पुढील काही दिवसात भाजपला रामराम करणार असल्याची चर्चा सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सुरु झाली आहे.
मंगळवारी समरजितसिंह यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची देखील भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
या संपूर्ण घडामोडीवर भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना राहुल देसाई पक्षावर नाराज असून त्यांना लवकरच मोठी जबाबदारी मिळणार आहे. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली.