बदलापूर प्रकरणात गिरीश महाजनांकडून मोठी माहिती; केस उज्वल निकम लढणार
मुंबई : बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर जवळपास 10 तासांपासून बदलापूर (Badlapur) स्थानकावर असंख्य नागरिक आंदोलनासाठी ट्रॅकवर उतरली आहे. याठिकाणी सरकारच्यावतीने आंदोलकांना समजावण्यासाठी गिरीश महाजन दाखल झाले होते. जवळपास अर्धा तास महाजनांनी उपस्थित आंदोकांना समाजावण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर, महाजनांनी हात जोडून आंदोलन मागे घ्या अशी विनंती करण्यात आली. मात्र, अद्यापही बदलापूर स्थानकावर आंदोलक ठाम आहेत. या सर्व घडामोडींमध्ये महाजनांनी एक महत्त्वाची माहिती दिली असून, बदलापूरची केस उज्वल निकम लढणार असल्याची माहिती चर्चेदरम्यान महाजनांकडून उपस्थितांनी दिली आहे. (Girish Mahajan On Badlapur School Minor Girl Rape Case )
VIDEO | Maharashtra Minister Girish Mahajan addresses protesters at Badlapur railway station as agitation intensifies over the alleged sexual assault of two nursery kids by male attendant at a local school.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/csbj9a8zdw
— Press Trust of India (@PTI_News) August 20, 2024
जेवढा राग तुमच्या मनात तेवढाच आमच्याही मनात
“बदलापुरात झालेल्या घटनेबद्दल जेवढा तुमच्या मनात राग आहे. तेवढा आमच्या मनातही आहे. चर्चेतून विषय सुटत असतो. इथे कुणाची लीडरशीप नाहीये. कुणी कुणाचं ऐकत नाही. तरुण आहेत. त्यांचा राग योग्य आहे. पण रेल्वे बंद करणं हा पर्याय नाही. एसआयटी नेमली आहे. फार्स्ट ट्रॅकमध्ये खटला चालवणार आहेत. उज्ज्वल निकम यांना आम्ही हा खटला चालवायला देणार आहोत” असे महाजनांनी सांगितले.
बदलापूर घटनेनंतर राज ठाकरेंचे मनसैनिकांना थेट आदेश; म्हणाले, आरोपीला…
आपल्याकडे थेट फाशी द्यायचा कायदा नाही
महाजनांनी उपस्थित आदोलकांना खूपवेळ समाजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक आरोपीला फाशी देण्याच्या मागणीवर ठाम होते. त्यावेळी पीआयला निलंबित केलं. मुख्याध्यापकाला निलंबित केलं. कुणाची लीडरशीप नाहीये. एका गावचेही नाही. स्थानिकही नाही. त्यामुळे कुणाशी बोलावं. कुणाला कोण समजावणार हे कठिण झालं आहे. तुम्ही आरोपीला फाशी द्या असं म्हणत आहेत. पण आपल्याकडे तसा कायदा नाही. तुम्हाला जे हवं तेच होईल, नराधमाला फाशीच दिली जाईल मात्र, आता आंदोलन मागे घ्या असे महाजन म्हणाले. (Girish Mahajan)
Badlapur : आंदोलक बदलापुरचे नाहीत, ही राजकीय स्टंटबाजीच; भाजप आमदाराने लावला शोध
काही दिवसांत घटनेचा तपास पूर्ण होईल, त्यानंतर तुम्हाला जे हवं आहे तेच होईल आंदोलकांमधून कोणी एकाने आमच्यासोबच चर्चा केली पाहिजे त्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करायला वेळ लावला आम्हाला मान्य आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली. जे पोलिस दिरंगाई करीत होते त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. चिमुकल्यांना नक्कीच न्याय मिळेल, विश्वास ठेवा अशी साद महाजन यांनी आंदोलकांना घातली. मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहेत.