गिरीश महाजन माणसाला फसवतो, ज्या ज्या आंदोलनात हा माणूस…; बीडमधून जरांगेंचा हल्लाबोल

गिरीश महाजन माणसाला फसवतो, ज्या ज्या आंदोलनात हा माणूस…; बीडमधून जरांगेंचा हल्लाबोल

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा सध्या राज्यात चांगलाच गाजत आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सगेसोयरेची (Sagesoyre) अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. मात्र, या मागणीला ओबीसी नेत्यांचा विरोध होत आहे. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीही सगेसोयरेचं आरक्षण टीकणार नाही असं म्हटलं. त्यावरून आता मनोज जरांगेंनी महाजन जोरदार हल्लाबोल केला.

विधानपरिषदेत ‘मनसे’ ठरणार हुकूमी एक्का? एका मतासाठी मविआ-महायुतीत रस्सीखेच 

गिरीश महाजन माणसाला फसवतो. ज्या ज्या आंदोलनात तो माणूस गेला, ते आंदोलन कायमचं बंद पडलं, अशी टीका जरांगेंनी केली.

बीडमध्ये आज मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीची सभा झाली. यावेळी बोलतांना जरागेंनी महाजन यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मराठा आणि कुणबी एकच आहेत. हा कायदा लागू करण्यासाठी आम्ही दहा महिन्यांपासून मागणी करत आहोत. ज्यावेळी आमची सरकारची बोलणी सुरू झाली. तेव्हा चार मुद्द्यांवर चर्चा सुरू होती. ज्या मराठ्यांची नोंद सापडली, त्या नोंदीच्या आधारावर नोंद न सापडलेल्या मराठ्यांना, त्याच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्याययं. सगेसोयऱ्यांवर चर्चा झाली. पण, मला माहित होतं, गिरीश महाजन माणसाला फसवतो. ज्या ज्या आंदोलनात तो माणूस गेला, ते आंदोलन कायमचं बंद पडलं. त्याला वाटतंय, तोच खूप हुशार आहे. पण, मी त्याच्या पुढचा आहे, असा एकेरी उल्लेख करत जरांगेंनी महाजन यांच्यावर टीका केली.

मराठा आरक्षण बैठकीला दांडी; जरांगेंनी सत्ताधारी अन् विरोधकांना नॉनस्टॉप धुतलं 

जरांगे म्हणाले, सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतीत हा काहीतरी बोलेल. काहीतरी खोडी काढेल, याची मला खात्री होती. तसा तो म्हणाला, सगेसोयरे टीकणार नाही. हा त्याचा डाव होता. महाजन, मला माहित होतं तुम्ही डाव टाकणार, पण सरकार कुणाचंचं नसतं, मला माहित आहे. मी मराठ्यांसाठी माझे रक्त आटवायला तयार आहे, असंही जरांगे म्हणाले.

मराठ्यांची मते घ्यायला गोड लागतं
जरांगे म्हणाले, सरकारने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरुन बैठक बोलावली होती. या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दांडी मारलीयं. विरोधक नेत्यांना बैठकीला जाण्यासाठी काय रोग आला होता. त्यांनी बैठकीला जात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली पाहिजे होती. महाविकास आघाडीला मराठ्यांची मते घ्यायला गोड लागतं, असा खोचक टोला मनोज जरांगे यांनी महाविकास आघाडीला लगावलायं.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज