कोट्यवधींचा आमदार बनला एक दिवस भिकारी; पराग शाहांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

MLA Parag Shah Dressed  Beggar : सुरुवातीला हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, यामागचं कारण समोर आल्यानंतर खर कारण स्पष्ट झालं.

News Photo   2026 09 14T105308.217

MLA Parag Shah dressed as a beggar

MLA Parag Shah Dressed  Beggar :  मुंबईतील घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. (MLA) कोट्यवधींची संपत्ती असलेले पराग शाह चक्क भिकाऱ्याच्या वेषात घाटकोपरच्या रस्त्यावर फिरताना या व्हिडीओत दिसत आहेत. सुरुवातीला हा प्रकार पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, यामागचं कारण समोर आल्यानंतर हा वेगळाच अनुभव असल्याचं स्पष्ट झालं.

जैन धर्मियांचा चातुर्मास सुरू असताना पराग शाह यांचे गुरु नम्रमुनी यांनी त्यांना एक दिवस भिकाऱ्याचं जीवन अनुभवण्याचा सल्ला दिला. गुरुंच्या या सूचनेनुसार शाह यांनी सुरक्षाव्यवस्था, वाहनं आणि महागड्या वस्तू बाजूला ठेवत भिकाऱ्याचा वेष धारण केला. त्यानंतर ते काही तास घाटकोपरच्या रस्त्यांवर फिरले, नागरिकांकडून भीक मागितली, मिळालेलं अन्न खाल्लं आणि रस्त्याच्या कडेला बसून भिकाऱ्याचं जीवन अनुभवलं.

गणराया पाऊस घेऊन आला; राज्यात बाप्पाच्या आगमनासोबत वरुणराजाची हजेरी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

या अनुभवाचा आणखी एक वेगळा भाग म्हणजे शाह यांनी ज्या ठिकाणी भिकाऱ्याच्या वेषात वेळ घालवला, त्याच ठिकाणी नंतर मेकअप काढून पुन्हा भेट दिली. यावेळी त्यांनी त्या नागरिकांशी संवाद साधत भिकाऱ्याच्या रूपात असताना त्यांच्या मनात काय भावना होत्या, याचा अनुभव घेतला. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, राजकीय वर्तुळातही त्यांच्या या कृतीची चर्चा सुरू झाली आहे.

पराग शाह हे महाराष्ट्रातील सर्वाधिक संपत्ती घोषित करणाऱ्या आमदारांपैकी एक आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात 3383 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती जाहीर केली होती. पाच वर्षांपूर्वी त्यांची संपत्ती सुमारे 500 कोटी रुपये होती. रिअल इस्टेट क्षेत्रात सक्रिय असलेले शाह यापूर्वी महानगरपालिकेचे नगरसेवकही राहिले आहेत. त्यामुळे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक असलेला आमदार एक दिवस भिकाऱ्याच्या भूमिकेत वावरल्याचा हा प्रसंग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Exit mobile version