Ahmednagar : हिंदुत्ववादाच्या विरोधात लढेल त्याला जशाच तसे उत्तर देऊ : प्रसाद लाड यांचा इशारा

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील उंबरे गावात शिकवणीच्या नावाखाली धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आता विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत ठोस कारवाईची मागणी केली. तसेच जो हिंदुत्ववादाच्या विरोधात लढेल त्याला आम्ही जशाच तसे उत्तर देऊ. आम्ही लव्ह जिहाद अजिबात सहन […]

WhatsApp Image 2023 07 31 At 1.56.42 PM

WhatsApp Image 2023 07 31 At 1.56.42 PM

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील उंबरे गावात शिकवणीच्या नावाखाली धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आता विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत ठोस कारवाईची मागणी केली. तसेच जो हिंदुत्ववादाच्या विरोधात लढेल त्याला आम्ही जशाच तसे उत्तर देऊ. आम्ही लव्ह जिहाद अजिबात सहन करणार नाही. हा प्रश्न आमच्या आई – बहिणीचा आहे. अशा शब्दात आमदार लाड यांनी या घटनेचा निषेध केला आहे. (MLA Prasad Lad on Ahmednagar Hinduism incidence)

राहुरी तालुक्यातील उंबरे या गावात घडलेल्या अल्पवयीन मुलींच्या धर्मांतराच्या मुद्द्यावरून विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी आज नगर जिल्ह्यात येत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली. पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना लाड म्हणाले, घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जावी यासाठी मी आज पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींवर योग्य ती कलमे व कारवाई केली जात आहे की नाही याबाबत देखील माहिती घेतली आहे.

दरम्यान पीडित मुलींची तक्रार दाखल करून घेण्यात विलंब करण्यात आला. याबाबत पोलीस अधीक्षकांना जाब विचारण्यात आला. दरम्यान पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे तसेच या प्रकरणी निष्काळजीपणा दाखविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल अशी माहिती लाड यांनी दिली आहे. अशा घटना घडत असतील तर ते योग्य नाही जर येथील पोलीस प्रशासन अशा घटनांबाबत सतर्क नसतील अशा अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करून त्यांच्या जागी नवे अधिकारी नेमवावे अशी मागणी देखील यावेळी लाड यांनी केली आहे.

भिडेंचा बोलवता धनी कोण? पंतप्रधानांच्या कानावर या गोष्टी घातल्या पाहिजे; भुजबळ संतापले

जो हिंदुत्ववादाच्या विरोधात लढेल त्याला आम्ही जशाच तसे उत्तर देऊ. आम्ही लव्ह जिहाद अजिबात सहन करणार नाही. हा प्रश्न आमच्या आई – बहिणीचा आहे. अनेक ठिकाणी मुली बेपत्ता होत आहे. अशा घटना रोखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच अशा घडल्या तर आमच्या पक्षाच्यावतीने देखील सडेतोड उत्तर दिले जाईल असे लाड म्हणाले.

Exit mobile version