भिडेंचा बोलवता धनी कोण? पंतप्रधानांच्या कानावर या गोष्टी घातल्या पाहिजे; भुजबळ संतापले
Chagan Bhujbal : संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल अत्यंत गलिच्छ वक्तव्य केलं आहे. त्यानंतर आता ते महात्मा फुले यांच्याबद्दल देखील बोलले आहेत. त्यामुळे भिडे यांच्या मागे बोलवता धनी कोण आहे याचे देखील विचार करण गरजेचे आहे. इतिहास बदलता येईल का असे काय सुरू आहे का? या माणसाला ताबडतोब अटक केली पाहिजे. अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. (Chagan Bhujbal criticize Sambhaji Bhide on his statement on MK Gandhi and Mahatma Phule )
Lebanon: पॅलेस्टिनी निर्वासित छावणीवर गोळीबार, पाच ठार; परिस्थिती नियंत्रणात
पुढे भुजबळ असं ही म्हणाले की, उद्या पंतप्रधान पुणे मध्ये येत आहेत त्यांच्या कानावर देखील या गोष्टी घातल्या पाहिजे. तसेच भिडे यांच्यावर कडक कारवाई करून सरकारने अटक केली पाहिजे. दुसरीकडे अशी वक्तव्ये करताना भिडे 15 ऑगस्ट देखील मानायला तयार नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे बाकीच्या लोकांवर देशद्रोह चे गुन्हे दखल करून अटक करता यांना देखील अटक करून ठेवा ना जेलमध्ये. मागणी भुजबळ यांनी केली आहे.
नगर हादरलं ! रक्ताच्या थारोळ्यात आढळला बेपत्ता निवृत्त लष्करी जवानाचा मृतदेह
दरम्यान यावेळी भुजबळ यांना मोदींच्या पुणे दौऱ्यावेळी त्यांना जो पुरस्कार मिळणार त्याला शरद पवार हजर राहणार का? त्यावर भुजबळ म्हणाले की, मला याची कल्पना नाही त्यामुळे यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. लोकमान्य टिळक पुरस्कार समितीवर शरद पवार देखील आहेत त्यामुळे कदाचित ते जात असतील. पण तिथे जायचे का नाही ते पवार साहेब ठरवतील. तर नितीन गडकरी आणि शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली का? केली मला माहीत नाही पण अशी टीका करून मैत्रिमध्ये दुरावा निर्माण करू नये. असं भुजबळ म्हणाले.
काय म्हणाले संभाजी भिडे?
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केल्यानं भिडे यांच्या वक्तव्याविरोधात ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत. अशातच अमरावती येथे आयोजित व्याख्यानात बोलतांना संभाजी भिडेंनी पुन्हा वादग्रस्त विधान केलं. यावेळी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, साईबाबा आणि राजा राममोहन रॉय यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊ टीका केली.
संभाजी भिडे यांनी महात्मा फलेंबद्दल अश्लाघ्य भाषेत तोंडसुख घेतलं. देशात इंग्रजांनी ज्या …….समाजसुधारकांच्या पदव्या केल्या, फुलेही त्या समाजसुधारक नावाच्या भxxxx यादीतले असल्याचे वक्तव्य भिडेंनी केलं. ते म्हणाले की, इंग्रजांनी भारतीयांना राज्य कसे मिळवायचे हे शिकवण्यासाठी देशात सुधारक नावाची जात निर्माण केली. निवडक लोकांना सुपर समाजसुधारकांच्या पदव्या देऊन तुमचेच वैरी तुमच्यावर सोडले. त्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील भारतप्रसाद मिश्रा, बंगालमध्ये राजा राममोहन रॉय, तामिळनाडूतील रामास्वामी नायकर आणि महाराष्ट्रात महात्मा फुले यांचा समावेश होता. या सगळ्यांच्या ढुंxxxx देशद्रोहाचे शिक्के असून माझ्याकडे त्याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. यावर मी दोन तास भाषण करून मोठे खुलासे करू शकतो, असं भिडे म्हणाले.