Download App

रोहित पवारच भाजपमध्ये येणार होते… राष्ट्रवादीला ब्लॅकमेल करुन तिकीट मिळवलं; राम शिंदेंचा गौप्यस्फोट

अहमदनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापूर्वी रोहित पवारच भाजपमध्ये येणार होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी पक्षाला ब्लॅकमेल करुन तिकीट मिळवलं होतं, असा गौप्यस्फोट करत भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. (MLA Ram Shinde allegation’s on Rohit Pawar that he was going to join BJP before Deputy Chief Minister Ajit Pawar)

काय म्हणाले राम शिंदे?

रोहित पवार यांच्यावर टीका करताना राम शिंदे म्हणाले, रोहित पवारांनी त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या निवडणुकीचे तिकीट पक्षाला ब्लॅकमेल करूनच मिळवलं होत. 2017 मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीवेळी तिकीट देता की मी भाजपमध्ये जाऊ अशी थेट धमकीच त्यांनी राष्ट्रवादीला दिली होती. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्येही रोहित पावर यांनी हडपसर मतदारसंघातून भाजपकडे तिकीट मागितलं होतं, असाही आरोप आमदार शिंदे यांनी केला.

Rohit Pawar : अजित पवार गट करतोय आमदारांना ब्लॅकमेल; रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ

रोहित पवार हे भाजपकडून तिकीट मिळावं यासाठी प्रयत्नशील होते. त्यासाठी ते भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही भेटले होते. त्यांच्याकडे रोहित पवार यांनी हडपसर किंवा शिवाजीनगरमधून विधानसभेच्या तिकीटाची मागणी केली होती, असाही दावा आमदार शिंदे यांनी केला. दरम्यान, आता राम शिंदे यांच्या या आरोपांवर रोहित पवार काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रोहित पवारांकडे अजितदादांएवढे मेरिट आहे का?

यावेळी बोलताना आमदार शिंदे यांनी कोणाच्या कपाळाला कपाळ घासून यश मिळत नाही असं म्हणत आमदार पवार यांच्यावर खोचक टीका केली. अजित पवार मागील 30 वर्षांपासून राजकारणात आहेत, रोहित पवारांकडे तेवढे मेरिट आणि क्षमता तरी आहे का? कोणाच्या कपाळाला कपाळ घासून यश मिळत नाही, असं शिंदे म्हणाले.

कार्पोरेट्सची अब्जावधी रुपयांची कर्जमाफ करायची अन् पोशिंद्याला…; सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका

अजित पवार गट करतोय आमदारांना ब्लॅकमेल

अजित पवार गट आमदारांना ब्लॅकमेल करतोय असा आरोप नुकताच रोहित पवारांनी केला होता. काही नेत्यांचं ब्लॅकमेलिंग सुरू आहे. सही कर नाहीतर तुझ्यासंदर्भात कारवाई करू. एखादं महत्वाचं काम तोपर्यंत आम्ही पूर्ण होऊ देणार नाही जोपर्यंत तुम्ही सही करत नाही, असे प्रकार घडत असल्याचे आमच्या कानावर आल आहे. अशा पद्धतीने ब्लॅकमेल केले जात आहे, असं रोहित पवार म्हणाले होते.

Tags

follow us