Rohit Pawar : अजित पवार गट करतोय आमदारांना ब्लॅकमेल; रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शरद पवार गटातील एक खासदार आणि आमदार अजित पवार गटात जाण्यासंदर्भात माहिती मिळाल्याने खळबळ उडाली आहे. हे लोकप्रतिनिधी कोण आहेत, त्यांनी खरंच अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे का याची स्पष्ट माहिती अद्याप मिळाली नसली तरी या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवार(Ajit Pawar) गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत अजित पवार गटासह भाजपवर (BJP) जोरदार टीका केली.
अजितदादा अन् शिंदेंना भाजपने का जवळ केलं? रोहित पवारांच्या उत्तरात दडलाय भाजपचा प्लॅन
आमदार खासदार अजित पवार गटाला पाठिंबा देत असल्याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले. यावर रोहित पवार म्हणाले, काही नेत्यांचं ब्लॅकमेलिंग सुरू आहे. सही कर नाहीतर तुझ्यासंदर्भात कारवाई करू. एखादं महत्वाचं काम तोपर्यंत आम्ही पूर्ण होऊ देणार नाही जोपर्यंत तुम्ही सही करत नाही, असे प्रकार घडत असल्याचे आमच्या कानावर आल आहे. अशा पद्धतीने ब्लॅकमेल केले जात आहे.
शेवटी आमदाराला काय पाहिजे असतं. त्यांच्या मतदारसंघातील कामं पूर्ण व्हावीत, प्रश्न निकाली निघावे यासाठीच ते प्रयत्न करत असतात. तू सही कर नाहीतर काम होणार नाही,असे आमदारांना ब्लॅकमेल केले जात असल्याचे काही नेते आम्हाला सांगतात. अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून कदाचित आज आमदारांची आकडा तुमच्या बाजूने दिसेल पण, जेव्हा निवडणुका होतील तेव्हा खरं चित्र समोर येईल. कुणाच्या बरोबर किती लोकं आहेत हे देखील समजेल, असे पवार म्हणाले.
कार्पोरेट्सची अब्जावधी रुपयांची कर्जमाफ करायची अन् पोशिंद्याला…; सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका
म्हणून अजितदादांना भाजपने सोबत घेतलं
एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांना भाजपने फक्त लोकसभेसाठी (Lok Sabha Election) जवळ केलं आहे. पण, लोकांच्या मनात भाजपविरोधी वातावरण आहे. भाजप फक्त लोकसभा निवडणुकांचा विचार करत आहे. एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना भाजपने फक्त लोकसभेसाठी जवळ केलं आहे. पण, लोकांच्या मनाचा कौल घेतला तर वातावरण भाजपाच्या विरोधात आहे. भाजपाबरोबर गेलेल्या लोकांनी कुठेच जनमत राहिलेलं नाही, अशा शब्दांत रोहित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्यांच्या या टीकेवर आता भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.