Ram Shinde On Sujay Vikhe Patil : सुजय विखे विधानपरिषदेसाठी इच्छुक आहेत, पण आमच्याकडे इच्छुक खूप असल्याचं सूचक विधान सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांनी केलंय. विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकीचा बिगुल वाजलायं. अशातच भाजपकडून उमेदवारीसाठी अनेकांची भाऊगर्दी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अहिल्यानगरमधून माजी खासदार सुजय विखे, (Sujay Vikhe) प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची चर्चा जोर धरु लागलीयं. निवडणुकीच्या आधी सभापती राम शिंदे यांनी सुजय विखेंच्या उमेदवारीबाबत मोठं विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीयं.
पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेणार आहेत. निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. यामध्ये सत्यजित कदम, भानुदास बेरड यांच्यासह माजी खासदार सुजय विखे हे देखील इच्छुक आहेत. ते राज्यसभेला देखील इच्छुक होते आता विधान परिषदेसाठी देखील इच्छुक आहेत. आपण मागच्या दाराने जाणार नाही, असं ते म्हणाले होते. त्यामुळे आमच्याकडे उमेदवारांची देखील कमी नाही. याबाबत या निवडणुकीसाठी पक्ष पातळीवर निर्णय होईल, तसेच काही वेगळा देखील निर्णय होऊ शकतो असे सूचक वक्तव्य राम शिंदे यांनी केले आहे.
गोड बोलून मैत्री करायची अन् डाव टाकायचा; 140 हून अधिक तरुणींना जाळ्यात ओढणाऱ्या भामट्याला अटक
प्राजक्त तनपुरेंचा अर्ज आलेला नाही…
विधान परिषदेसाठी प्राजक्त तनपुरे यांचे नाव चर्चेत आहे. यावर शिंदे म्हणाले, त्यांचा कुठलाही अर्ज आमच्यापर्यंत आलेला नाही. त्यांचा व भारतीय जनता पार्टीचा सध्या तरी कोणताही संबंध नाही. याबाबत त्यांनी देखील खुद्द स्पष्टीकरण दिलेला आहे. मात्र, राहुरी पोटनिवडणुकीत त्यांनी माघार घेतली हे देखील विसरता येणार नाही. अद्याप तनपुरे यांनी भाजपकडे याबाबत कुठल्याही प्रकारची मागणी केलेली नाही. तनपुरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात काय चर्चा झाली याबाबत योग्यवेळी समजेल असे राम शिंदे यांनी स्पष्ट केलं.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सत्यजित कदम हे इच्छुक असून त्यांनी राम शिंदे यांची भेट घेतली. तसेच विधान परिषदेसाठी ऍडमिशन चालू आहेत. अहिल्यानगरची जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी, अशी आमची अपेक्षा असल्याचंही राम शिंदे यांनी स्पष्ट केलंय. तसेच विधानपरिषदेला निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळेल, अशी सर्वांची अपेक्षा आहे. मात्र, ऐनवेळी वेगळा निर्णय देखील होऊ शकतो, असे सूचित इशारा देखील शिंदे यांनी वर्तवलायं.
Nitesh Rane : तुझी जीभ जास्तच वळवळत असेल..,; नितेश राणेंची सपकाळ यांना खुलेआम धमकी!
रोहित पवार आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेते…
शरद पवार हे भाजपात जाणार असतील तर मी भाजपामध्ये जाणार नाही असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केली. यावर बोलताना सभापती राम शिंदे म्हणाले, आज्याला नातू काय शिकवणार हाच खरा प्रश्न आहे. शरद पवारांचं देखील ऐकत नाही, त्यांची दिवसेंदिवस राजकीय उंची वाढत चालली आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी रोहित पवार यांना खोचक टोला लगावला. पुढे बोलताना शिंदे म्हणाले, रोहित पवार हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेते आहेत. शरद पवार भाजपात जाणार आहे का? हे मी त्यांना विचारू शकत नाही, मात्र रोहित पवारांनी असं उलट वक्तव्य का केलं? याची माहिती खुद्द शरद पवार देऊ शकतात, असं देखील शिंदे म्हणाले.
