आमदार पठारेंचे IPS जावई अखेर पुण्यातच! अमोल झेंडेंनी मीरा-भाईंदरला झालेली बदली रद्द करून आणलीच

MLA Pathare's IPS son-in-law Amol Zhende यांची बदली करण्यात आली होती. मात्र अखेर त्यांनी ती बदली रद्द करून घेतलीच आहे.

MLA Pathare's IPS son-in-law in Pune Amol Zhende

MLA Pathare’s IPS son-in-law in Pune Amol Zhende cancelled his transfer to Mira-Bhayander brought back : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये आयएएस अधिकारी आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या सातत्याने बदल्या केल्या जात आहेत. यामध्ये नुकत्याच झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार असलेल्या बापू पठारेंचे जावई आयपीएस अधिकारी अमोल झेंडे यांची बदली करण्यात आली होती. मात्र अखेर त्यांनी ती बदली रद्द करून घेतलीच आहे.

अमोल झेंडेंनी बदली रद्द करून आणलीच

राज्यातील पोलिस प्रशासनात मोठा फेरबदल होत आहे. गेल्या आठवड्यात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात झेंडे यांची 21 मे 2026 रोजी करण्यात आलेली मीरा भाईंदर वसई विरार येथे झालेली बदली रद्द करून त्यांना पुन्हा पुण्यामध्येच असलेल्या पीएमआरडीए येथे बदली देण्यात आली आहे.

गोड बोलून मैत्री करायची अन् डाव टाकायचा; 140 हून अधिक तरुणींना जाळ्यात ओढणाऱ्या भामट्याला अटक

त्यांच्या या बदलीमुळे राजकीय क्षेत्रात त्यांच्या असलेल्या कुटुंबीयांचा प्रभाव स्पष्ट दिसत असल्याची टीका केली जात आहे. कारण झेंडे यांचे सासरे हे बापू पठारे आहेत जे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार आहेत. तर झेंडे यांच्या पत्नी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत.

दुसरीकडे झेंडे यांच्यासोबत इतरही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये

follow us