Satyajeet Tambe : सालाबादप्रमाणे यंदाही गणरायाचे घरोघरी उत्साहात आगमन झाले असून, गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या संगमनेर येथील निवासस्थानीही सहपरिवार गणेशाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजाला एकत्र आणणारा, आनंदाची देवाण-घेवाण घडवून आणणारा आणि सकारात्मक विचारांची देवाण-घेवाण करण्याची संधी देणारा उत्सव आहे, असे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देताना समाजाने एकत्र यावे, परस्परांमध्ये विचारांची देवाण-घेवाण व्हावी आणि त्यातून समाजात चांगले वातावरण निर्माण व्हावे, ही भूमिका मांडली होती. आजही गणेशोत्सवाच्या माध्यमातून हीच सामाजिक भावना पुढे नेणे गरजेचे आहे, असे तांबे यांनी नमूद केले. गणेशोत्सवामध्ये लहान मुलांपासून महिला, माता-भगिनी तसेच नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. विविध गणेश मंडळांमध्ये उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामुळे या उत्सवाच्या माध्यमातून समाजात उत्साह, आनंद आणि एकोप्याचे वातावरण निर्माण होते.
दिशा सालियन मृत्यू प्रकरण; आदित्य ठाकरेंसह रिहा चक्रवर्ती, डिनो मोरियाचं FIR मध्ये नाव
गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या जीवनातील विघ्ने दूर करून सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येतो, अशी श्रद्धा लहान मुलांसह सर्वांच्याच मनात असते. त्यामुळे गणरायाच्या आगमनाचा हा उत्सव प्रत्येकासाठी आनंदाचा क्षण असल्याचेही तांबे यांनी सांगितले. दरम्यान, आमदार सत्यजीत तांबे यांच्या संगमनेर येथील घरी पुढील पाच दिवस गणरायाचे वास्तव्य असणार आहे. या कालावधीत नागरिकांनी त्यांच्या घरी येऊन गणरायाचे दर्शन घ्यावे, आशीर्वाद घ्यावेत, असे निमंत्रण त्यांनी यावेळी दिले. गणेशोत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
