Download App

बीडमधला पहिल आमदार जो धनंजय मु्ंडेंच्या बाजूने बोलला; मस्साजोगची घटना दुर्दैवी मात्र बीडला…

बीडचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही राजीनाम्याची मागणी लावून धरलेली आहे. आष्टीचे भाजप आमदार सुरेश

  • Written By: Last Updated:

Vijaysinh Pandit on Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीकडून तपास सुरु आहे. याच प्रकरणाशी निगडीत असलेल्या खंडणीच्या प्रकरणाचा तपास सीआयडी करीत आहे . (Dhananjay Munde ) या सगळ्या घटनेचा तपास हायकोर्टाचे न्यायाधीश स्वतंत्रपणे करणार आहेत. दरम्यान, आजी-माजी लोकप्रतिनिधी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत असताना गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी धनंजय मुंडेंची बाजू घेतली आहे.

काय म्हणाले विजयसिंह पंडित?

मस्साजोगची घटना दुर्दैवीआहे. अशा प्रवृत्तीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. पण असं असताना दुसरीकडे बीडची बदनामी होता कामा नये. बीडचा बिहार होतोय, असं म्हणणं चूक आहे. मुंबई-पुण्याचे लोक बीडचा माणूस म्हटलं तर खालीवर बघतात. अशी प्रतिमा करणं चूक आहे. सुरेश धस यांचं नाव न घेता विजयसिंह पंडित बोलत होते.

आंतरवाली येथे माध्यमांशी बोलताना पंडित म्हणाले की, मी याप्रकरणी अजितदादांची भेट घेणार आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा विषय राजकीय आहे. वरिष्ठ पातळीवरचे लोक त्याबाबतचा निर्णय घेतील. संतोष देशमुख खून प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. त्याला पकडलं नाही तर मी याबाबत सरकारला जाब विचारेन.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत संदिप क्षीरसागरांचा मोठा दावा; म्हणाले, वाल्मिक कराड

दरम्यान, बीडमधून पहिल्यांदाच एक आमदार मंत्री धनंजय मुंडेंच्या बाजूने बोलल्याचं दिसतंय. विजयसिंह पंडित हे गेवराईचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार आहेत. त्यांच्याच पक्षाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे.

बीडचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही राजीनाम्याची मागणी लावून धरलेली आहे. आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनीही मुंडेंचा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा झाला पाहिजे, असं म्हटलंय. केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही.

follow us