Mahavikas Aghadi : विधान परिषदेची नुकतीच निवडणुक पार पडली. या निवडणुकीमध्ये मतं फुटले आहेत. त्यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, यावरून आता महाविकास आघाडीतीलही तिढा समोर आला आहे. (Mahavikas Aghadi ) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनचे उमेदवार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे काँग्रेस आमदारांच्या मतांच्या पाठिंब्याने आरामात विजयी झाले असले तरी मतदानाच्या एक दिवस अगोदर काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये पडद्यामागून बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्याचं समोर आलं आहे.
मोठी बातमी! छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला; काल टीका अन् आज भेट, भेटीच कारण काय?
ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीचे 22 मत मिळाले. त्यावर ते विजयी झाले आहेत. ज्यात काँग्रेसची 7 आणि ठाकरेंच्या शिवसेनेची 15 आणि एक अपक्ष आमदार होता. खरं तर काँग्रेसची ही 7 मतं मिळवण्यासाठी ठाकरेंना खूप संघर्ष करावा लागला होता. कारण ठाकरेंना पाठिंब्यासाठी काँग्रेसने ज्या आमदारांचा प्रस्ताव दिला होता. त्या आमदारांची मतं फुटण्याची भीती होती. यामध्ये मोहनराव हंबर्डे, हिरामणी खोसकर, सुलभा खोडके, कुणाल पाटील आणि शिरीष चौधरी या काँग्रेस आमदारांच्या नावांचा समावेश होता. या आमदारांची मतं फुटण्याची ठाकरेंना भीती होती.
याबात राजकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरं तर ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा द्यायचा की शेतकरी आणि कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा, यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये दोन गट पडले होते. पृथ्वीराज चव्हाण, बंटी पाटील, नसीम खान आणि नाना पटोले यांनी ठाकरेंना आवश्यक सात मतांचा पाठिंबा देण्याची तयारी होती. तर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात हे शरद पवारांचे उमेदवार जयंत पाटलांच्या बाजूने मतं देण्याच्या भूमिकेत होते. ज्यामुळे ठाकरेंच्या उमेदवाराला मोठा धोका निर्माण झाला होता.
दिवाणखवटी बोगद्याजवळ दरड कोसळली; कोकण रेल्वे 13 तासापासून ठप्प; प्रवासी अडकून पडले
ठाकरेंचे नेते अनिल देसाई, विनायक राऊत आणि वरुण सरदेसाई यांनी काँग्रेसने सुरुवातीला दिलेल्या आमदारांच्या पाठिंब्याच्या नावाच्या प्रस्तावाला विरोध केला होता. याउलट ठाकरेंच्या सेनेने पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, ऋतुराज पाटील, अमित देशमुख, धीरज देशमुख आणि अस्लम शेख या आठ नावांची यादी दिली होती.