Mahavikas Aghadiच्या’ जागावाटपावर नाना पटोले स्पष्टच बोलले; म्हणाले, ‘काँग्रेसला २०१४ मध्ये धोका मिळाला…’

Mahavikas Aghadiच्या’ जागावाटपावर नाना पटोले स्पष्टच बोलले; म्हणाले, ‘काँग्रेसला २०१४ मध्ये धोका मिळाला…’

Maharashtra Politics: राज्यामध्ये लवकरच सत्ताबदल होणार होण्याची चर्चा जोरदार सुरु आहे. (Maharashtra Politics) आणि पुढचा मुख्यमंत्री आपलाच होणार, असा दावा महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) तिन्ही प्रमुख पक्षांकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे दोघे सतत महाविकास आघाडी आणि आगामी मुख्यमंत्री यावर अनेक प्रकारचे वक्तव्य करत असताना दिसून येत असतात.

अनेक माध्यमांकडून देखील या दोघांकडे जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाविषयी कायम सवाल विचारले जात असतात. यातच पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल, असा दावा खासदार राऊत यांनी केला आहे. तर महाविकास आघाडीमध्ये ज्या पक्षाच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री होणार, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली आहे.

नाना पटोले गेल्या काही दिवसात एका मुलाखतीमध्ये म्हणाले की, कोणत्याही कारणामुळे महाविकास आघाडी झाली नाही तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे. काँग्रेसचा हा प्लॅन बी काय आहे असा सवाल अनेकांना पडला आहे. दरम्यान नाना पटोले यांनी रविवारी (७ मे) रात्री याविषयीची महत्वाची भूमिका स्पष्ट केली आहे.

Sharad Pawar : एकत्रित काम करत असताना… ठाकरे गटाच्या अग्रलेखातील टीकेला पवारांचं उत्तर

काही माध्यमांच्या प्रतिनिधींनी नाना पटोले यांना काँग्रेसच्या प्लॅन ‘बी’विषयी विचारल्यावर पटोले म्हणाले, विधानसभेच्या जागावाटपाचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. तसेच ज्याचे जास्त आमदार असणार त्याचा मुख्यमंत्री होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, आतापर्यंतची जी परंपरा राहिली आहे, ती म्हणजे ज्याचे जास्त आमदार आहेत त्याचा मुख्यमंत्रीपद मिळणार आहे.

Sharad Pawar मोठे नेते पण… वारसदार निर्माण करण्यात अपयशी, सामनातून परखड टीका

ही आतापर्यंतची लोकशाहीची परंपरा आहे. यावेळी नाना पटोले यांना काँग्रेसच्या प्लॅन ‘बी’विषयी विचारल्यावर पटोले म्हणाले, ज्या पद्धतीने २०१४ मध्ये काँग्रेस पक्षाला सर्वात मोठा धोका मिळाला. त्यामुळे आम्ही सावध झालो आहोत. त्या धोक्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ज्या गोष्टी त्या-त्या वेळेस ठरणार आहेत. ज्यामध्ये जागा वाटपाचा मुद्दा असणार आहे, मुख्यमंत्री कोणाचा बनेल यासंबंधीचा निर्णय असेल, तेव्हा काँग्रेस सतर्क असणार आहे.

नाना पटोले पुढे म्हणाले की, हे सगळे निर्णय त्या-त्या वेळी घेतले जाणार आहेत. परंतु आज काँग्रेस पक्ष म्हणून, पक्षाचा राज्याचा प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की, माझा पक्ष प्रत्येक ठिकाणी उभा राहिला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्षाचे अस्तित्व निर्माण झाले पाहिजे आणि मी ते करत असलयाचे यावेळी त्यांनी सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube