MNS Activist broke Amol Mitkari car after criticize Raj Thackeray : विधान परिषदेचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची गाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी (MNS Activist) फोडली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सुपारी बाज म्हणत टीका केल्याने ही गाडी फोडली गेल्याचं सांगण्यात येत आहे.
जडेजाला पर्याय! हेड कोच गौतम गंभीर अन् सूर्याने शोधला नवा स्टार
दरम्यान या घटनेनंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अमोल मिटकरी अकोल्यामध्ये असतानाही घटना घडली. ते विश्रामगृहामध्ये कार्यकर्त्यांचे भेटीगाठी घेत होते. त्याचवेळी बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यामुळे या घटनेनंतर आता मनसे विरुद्ध अजित पवार गटाचा संघर्ष पेटला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याचा दौरा केला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, एक उपमुख्यमंत्री पुण्याचे आहेत, पण ते नसतानाही धरणं वाहिलं. मुळा – मुठा नदीत अनधिकृत बांधकामे झाली आहे त्यामुळे आता अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. सरकारने या गोष्टींचा विचार करणं गरजेचे आहे. मुसळधार पावसामुळे अनेक लोकांची वाहने पाण्याखाली होती. त्यामुळे अजित पवार यांच्यावर पुण्याची पूरस्थिती हाताळण्यात अपयश आल्यावरून ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
BSNL ला सरकारकडून पाठिंबा, ‘या’ शहरांमध्ये 5G साठी ट्रायल, Jio, Airtel ला मोठा धक्का ?
त्यावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुपारीबाचा शब्द वापरत राज ठाकरेंना उत्तर दिलं होतं मिटकरी म्हणाले होते की, दिलेल्या शब्द पाळणाऱ्या अजितदादांवर सुपारी बहाद्दरांनी बोलू नये सुपारी बहाद्दरांचं टोल नाका भोंगे किंवा अन्य कोणतेही आंदोलन यशस्वी झालं नाही त्यांची विश्वासार्हता संपलेली आहे. राज्याच्या इतिहासातील सार्वधिक अपयशी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे सूर्याला वाकुल्या दाखवण्याचा प्रकार आहे, असा टोला अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना लावला होता. यावरूनच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी थेट मिटकरींची गाडी फोडल्याची घटना घडली आहे.