जडेजाला पर्याय! हेड कोच गौतम गंभीर अन् सूर्याने शोधला नवा स्टार

जडेजाला पर्याय! हेड कोच गौतम गंभीर अन् सूर्याने शोधला नवा स्टार

Riyan Parag : भारतीय संघाचा नवा हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि टी 20 संघाचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या (Surya Kumar Yadav) कार्यकाळाची सुरुवात श्रीलंके विरूद्धच्या विजयाने (SL vs IND) झाली आहे. टीम इंडियाने टी 20 मालिका (Team India) जिंकली आहे. टी 20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या (Ravindra Jadeja) तिघांनी टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर (T20 Cricket) केली आहे.

टी 20 क्रिकेटमध्ये जडेजाने भारतीय संघासाठी महत्वाचं योगदान दिलं आहे. आता जडेजानंतर त्याची जागा घेणारा कोण असा प्रश्न संघ व्यवस्थापनाला पडला होता. आता मात्र या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याचं दिसत आहे. श्रीलंके विरूद्धच्या टी 20 सामन्यातच (IND vs SL) असा एक ऑलराऊंडर सापडला आहे जो फलंदाजी आणि गोलंदाजीत कमाल करू शकतो.

SL vs AFG : श्रीलंकेचा पराक्रम! दुसरा सामना जिंकत मालिकाही खिशात; अफगाणिस्तानचा पराभव

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात रियान पराग पार्ट टाइम गोलंदाजी करताना दिसला. सध्या तो पार्ट टाइम फिरकी गोलंदाज आहे. गरज पडल्यास तो गोलंदाजी करतो. परागने पहिल्या टी 20 सामन्यात फक्त 5 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या टी 20 सामन्यात त्याने चार ओव्हर्सचा कोटा पूर्ण केला मात्र त्याला विकेट मिळाली नाही. मात्र यावरून असे लक्षात येते की रियान व्यवस्थित गोलंदाजी करू शकतो.

आता त्याच्या गोलंदाजीत थोडी सुधारणा झाली तर तो नक्कीच रवींद्र जडेजाला पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो. पराग चांगला फलंदाज आहेच आता त्याने गोलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे. गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी त्याला आणखी गोलंदाजीची संधी दिली तर आगामी काळातील चित्र नक्कीच वेगळं असू शकतं.

आसामचा खेळाडू रियान पराग 22 वर्षांचा आहे. त्याने आयपीएलमध्ये (IPL) आतापर्यंत 70 सामने खेळले असून 1 हजार 173 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 6 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये त्याने चार विकेट्सही घेतल्या आहेत. परागसाठी आयपीएल 2024 चा सीझन फायदेशीर ठरला. यानंतरच त्याला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली. आयपीएल 2024 मध्ये 15 सामन्यांत रियान परागने 573 धावा केल्या होत्या.

IND vs SL : सूर्याला वनडेत डच्चू, रियानला दोन्ही संघात लॉटरी; संघ निवडीत’या’ खेळाडूंना संधी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube