Uddhav Thackeray and Raj Thackeray finally came together : राज्यातील सल्याच राजकीय पक्षांसह नागरिकांचं लक्ष लागून असलेल्या मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(Shivsena UBT) पक्षाच्या युतीची घोषणा अखेर आज करण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर एकत्र येत ठाकरे बंधूंकडून बाळासाहेबांच्या स्मृतीला सहकुटुंब अभिवादन करून, मुंबईतील(Mumbai) हॉटेल ब्लु सी येथून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे(Raj Thackrey) यांनी युतीची घोषणा केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे(Uddhav Thackrey) यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील ठाकरे घराण्याच्या योगदानाबद्दल आणि संघर्षाबद्दल माहिती दिली. मराठी माणसाची होणारी गळचेपी लक्षात घेता शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली होती.
आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत. मुंबईकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहणार नाही. मुंबईला महाराष्ट्रपासून तोडणाऱ्याला खात्मा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. भाजपवर देखील त्यांनी यावेळी टीका केली. मराठी माणूस सहसा कोणाच्या वाट्याला जात नाही, आणि त्याच्या वाट्याला गेला तर कोणाला सोडत नाही. वर बसलेल्या दोघांचे महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे मनसुबे आहेत. असल्याची विखारी टीका त्यांनी भाजपवर केली आहे. नाशिक आणि मुंबईमध्ये युती झाली असून, बाकी महापालिकांच्या निर्णय लवकरच होईल. रावसाहेब दानवेंविषयी प्रश्न विचारला असता त्यांना त्यांच्याच पक्षात किंमत नसल्याचं मिश्किल उत्तर येवेळी त्यांच्याकडून देण्यात आलं.
20 साल बाद! उद्धव-राज युती भाजप-महायुतीसाठी डोकेदुखी; मतदारांच्या आकड्यांचं ‘गणित’ चक्रावणारं
या युतीचा महाविकास आघाडीवर काय होईल यावर देखील त्यांनी भाष्य केलं. आज आम्ही आमची युती जाहीर केली असून महाविकास आघाडीशी चर्चा सुरू असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. त्याचप्रमाणे भाजपमधील मराठी वाचवण्यासाठी एकत्र येण्यास कोणी इच्छुक असेल तर त्यांचं देखील स्वागत आहे. त्याचप्रमाणे सगळे पक्ष बाहेर पडून आघाडी अबाधित असल्याचा टोला देखील त्यांच्याकडून लागवण्यात आला आहे. मराठी माणसाच्या हितासाठी महाराष्ट्र प्रेमींची ही युती आहे. एकंदरीत मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार असल्याचं ठाकरे बंधूंकडून सांगण्यात आलं.
