Raj Thackeray on Maratha Reservation : नुकताच मी मराठवाडा दौरा केला. त्यामध्ये काही मराठा समाजाचे लोक मराठा आरक्षणाच्या मागणीवर माझ्याशी बोलले. त्यावेळी मी स्पष्ट सांगितलं होत की, माझ्या महाराष्ट्रातील एकही तरुण आणि तरुणी कामाशिवाय राहणार नाहीत. फक्त माझ्या हातात सत्ता देऊन पाहा. परंतु, हे काम जातीच्या आधारावर दिलं जाणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. त्याचवेळी त्यांनी मराठा आरक्षणावर थेट भाष्य केलं आहे. ते मनसे पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. ही गोष्ट होऊ शकत नाही. तसंच, हे सत्य सगळ्या लोकांना माहिती आहे. ही गोष्ट राज ठाकरे खर बोलतो म्हणून लोकांना ते सहन होत नसेल असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. खूप वर्षापूर्वी एक मराठा समाजाचा मोर्चा आला होता. त्या मोर्चाचं स्वागत करणाऱ्या व्यासपीठावर सर्व पक्षाचे लोक होते. ते म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मग आडवलं कुणी असा प्रश्न उपस्थित करत फक्त तोंडाला पान पुसण्याचं हे काम आहे असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
सलमान तुझ्यामुळे आमच्या भावाला जीव गमवावा लागला; बाबा सिद्दिकींच्या हत्येवर बिश्नोई गँगची पोस्ट
हे आरक्षण देऊच शकत नाही. हे आरक्षण मिळूच शकत नाही. तसंच, हा फक्त मराठा समाजाचा विषय नाही. देशातील अनेक जातींचा विषय आहे. ते सर्व समोर आणावं लागेल. परंतु, त्यासाठी कुणाचीच हिंमत नाही. जर मराठा आरक्षणाचा विषय पुढं केला तर देशभरात सर्व जाती समोर येऊ शकतात. त्यामध्ये कुणालाचं हे झेपणार नाही. त्यामुळे सर्वांना माहिती असल्याने आरक्षण देण्याचं काम कुणीचं करणार नाही. हा विषय फक्त निवडणुकांवेळी पुढे येतो. त्यानंतर या विषयांकडं कुणीही पाहत नाही.
काही वर्षांपूर्वी मराठा समाजाचे अगदी शिस्तीत मोर्चे निघाले होते. इतके शिस्तीत निघालेले मोर्चे मी पहिल्यांदा पाहिले होते. परंतु, त्याचं पुढं काय झालं? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसंच, तोच मुद्दा घेऊन मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. परंतु, हा विषय कसा आहे हे मी त्यांनाही सांगितलं आहे असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मराठा समाजाला आरक्षण दिल. मात्र, हे शक्यच नाही. आणि तुम्हाला ते अधिकारचं नाहीत असंही राज ठाकरे यावेळी म्हणा्ले आहेत.