Download App

तुमच्यातील राग दिसत नाही; आता वचपा काढण्याची वेळ, राज ठाकरेंनी शुभेच्छा देताना केलं ‘हे’ आवाहन

आज दसरा आहे. सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. दर दसऱ्याला आपण सोने लुटतो, एकमेकांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्राचं सोनं अनेक वर्षांपासून लुटलं

  • Written By: Last Updated:

Raj Thackeray Dussehra Gathering :आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सकाळी पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. आज देशासह राज्यभरात (Dussehra Gathering) दसऱ्याचा सण साजरा होत आहे. दुसरीकडे राज्यात विविध पक्ष आणि संघटनांचे दसरा मेळावे होणार आहेत.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला, तुमची प्रतारणा केली. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, आता वचपा काढण्याची वेळ आली आहे. तसंच, “या सत्ताधाऱ्यांनी तुमची फसवणूक केली आहे. आत एकदा माझ्या सहकाऱ्यांना काम करण्याची संधी द्या, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र करून दाखवतो असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

विधानसभेच्या रणांगणाची पहिली झलकं; राज्यात आज दसरा मेळाव्यांचं वादळ, कुणाचा आवाज कुठं घुमणार

अवघ्या काही मिनिटांच्या या पॉडकास्टमध्ये राज ठाकरे म्हणाले, ‘आज दसरा आहे. सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. दर दसऱ्याला आपण सोने लुटतो, एकमेकांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्राचं सोनं अनेक वर्षांपासून लुटलं जात आहे. आपण मात्र फक्त एकमेकांना आपट्याची पानं वाटतो. आपल्या हातात आपट्याच्या पानांशिवाय काहीच राहत नाही आणि बाकीचे सगळे सोने लुटून चाललेत. पण आपण मात्र, कधी स्वतःच्या आयुष्यात तर कधी जातीपातीत मशगुल असतो असंही ते म्हणाले आहेत.

फ्लायओव्हर्स बांधणं म्हणजे प्रगती नव्हे. आपल्या हातात मोबाईल आला, टीव्ही आला म्हणजे याला प्रगती म्हणता येणार नाही. त्यामुळे प्रगती समाजाची व्हावी लागते. आपण अजूनही चाचपडत आहोत. असं असले तरी तुमच्यातील राग मला दिसत नाही, त्याच त्याच लोकांना दरवेळी निवडून देता आणि पश्चाताप करत बसता,” अशी खंतही यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

follow us