विधानसभेच्या रणांगणाची पहिली झलकं; राज्यात आज दसरा मेळाव्यांचं वादळ, कुणाचा आवाज कुठं घुमणार

  • Written By: Published:
विधानसभेच्या रणांगणाची पहिली झलकं; राज्यात आज दसरा मेळाव्यांचं वादळ, कुणाचा आवाज कुठं घुमणार

Dussehra Gathering 2024 : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून आज एकनाथ शिंदे गट, उद्धव ठाकरे गट या दोन पक्षांच्या दसरा मेळाव्यासह बीडमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांचे स्वतंत्र मेळावे होणार आहेत. त्यामुळे आज दसरा मेळाव्यांमध्ये आवाज कुणाचा?, याकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.

ठाकरे गटाचे दसरा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर सायंकाळी 5 वाजता, तर शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर सायंकाळी 5 वाजता होणार आहे. ठाकरे गटाकडून दीड ते दोन लाख लोक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली असून शिंदे गटाकडून एक ते दीड लाख लोक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आज गर्दीचा उच्चांक कोण मोडणार, याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हा अपघात जाणूनबुजून घडवण्यात आला? भारतीय रेल्वेचा खळबळजनक दावा NIA करणार तपास

बीडमध्ये मुंडे भाऊ-बहिणीचा मेळावा सकाळी 11 च्या आसपास आणि मनोज जरांगेंचा दसरा मेळावा सकाळी 11.30 च्या जवळपास सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान मनोज जरांगेंचा पहिल्यांदाच दसरा मेळावा होणार आहे. तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात ओबीसी आंदोलक नेते लक्ष्मण हाके देखील उपस्थित राहणार आहेत. मी येतोय, तुम्हीही या, असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी सर्वांना या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे.

पहिला दसरा मेळावा

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच मराठ्यांचा दसरा मेळावा होत असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. बीड जवळील नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून भाषणाचे व्यासपीठ तयार झालं आहे. नारायण गडावरील तब्बल 900 एकरवर हा दसरा मेळावा होत असून जवळपास 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. 10 वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले असून ज्या सुविधा आयसीयु विभागात दिल्या जातात, त्याच सुविधा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. 100 पेक्षा जास्त रुग्णवाहिका तैनात असणार आहेत. येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता, तब्बल 200 एकरवर पार्किंकची व्यवस्था असणार आहे. मनोज जरांगेंचा दसरा मेळावा दुपारी 1 वाजताच्या सुमारास होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube