हा अपघात जाणूनबुजून घडवण्यात आला? भारतीय रेल्वेचा खळबळजनक दावा; ‘NIA’ करणार तपास
Mysore Darbhanga Train Accident : म्हैसूर-दरभंगा भागमती एक्स्प्रेस (१२५७८) अपघाताबाबत भारतीय रेल्वेकडून खळबळजनक दावा समोर आला आहे. हा अपघात जाणूनबुजून झाल्याचा रेल्वेने संशय व्यक्त केला आह आहे. तामिळनाडूतील कावराईपेट्टई रेल्वे स्थानकावर हा अपघात झाला. बालासोरच्या बाबतीत घडल्याप्रमाणे ट्रेनला पुढे जाण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला होता. ट्रेन लूप लाईनमध्ये घुसली. तिथे आधीच एक मालगाडी उभी होती.
पॅसेंजर गाडीने मालगाडीला मागून धडक दिली. दरम्यान, चालक सावध झाला. धक्का जाणवताच त्याने ब्रेक लावला. या अपघातात अनेकजण जखमी झाले. काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघाताचा तपास रेल्वेने एनआयएकडे सोपवला आहे. रेल्वेनेही सीआरएस तपासाचे आदेश दिले आहेत.
मोठी बातमी! न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, जसप्रीत बुमराहकडे मोठी जबाबदारी
या अपघाताच्या चौकशीसाठी रेल्वेने एक समिती स्थापन केली आहे. सर्व बाजूंनी तपास केला जाईल. हा अपघात रेल्वे कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे झाला आहे की कोणीतरी जाणूनबुजून घडला आहे? या सर्व बाजूंनी तपास केला जाणार आहे. रेल्वेच्या सीएसआर तपासाव्यतिरिक्त, एनआयए देखील या घटनेची चौकशी करेल. सणासुदीचा काळ असल्याने ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या मोठी होती. सुदैवाने कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही.
अपघातानंतर दोन डब्यांना आग लागली
म्हैसूर-दरभंगा भागमती एक्स्प्रेस तामिळनाडूमधील कावराईपेट्टई रेल्वे स्थानकावर मालगाडीला धडकली तेव्हा तिच्या दोन डब्यांना आग लागली आणि सुमारे 12-13 डबे रुळावरून घसरले. या अपघातात 19 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ चेन्नईच्या शासकीय स्टॅनले मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी जखमींची भेट घेतली आहे.