Download App

Bala Nandgoankar : महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर मनसे नेत्याने ओढले ताशेरे, म्हणाले…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. प्रगत तंत्रज्ञानाच्या युगातही दस्त नोंदणीसाठी वेळ लागत असून दस्त नोंदणी कार्यालयाच्या कार्यपद्धतीत मोठी सुधारणा आवश्यक असल्याचं नांदगावकर म्हणाले आहेत.

“श्रीरामाने प्रामाणिकपणे सत्याचा मार्ग अवलंबला, संधीसाधू, पाठीत खंजीर खुपसणारे… ” अयोध्यावारीवरून सिब्बल यांचा शिंदेंना टोला

तसेच दस्त नोंदणीद्वारे राज्याला खूप मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो, यावर्षी देखील सुमारे 43000 कोटी महसूल शासनाला मिळाला आहे.

शिंदेंचे आमदार नाराज, काय गडबड आहे लवकरच कळेल; राऊतांच्या दावाने खळबळ

मात्र, नोंदणीसाठी गेलेल्या नागरिकांना सर्वर डाऊन असल्याचं कायमच ऐकायला मिळतं. त्यामुळे राज्याला महसूल देणाऱ्या लोकांना मनस्ताप सहन करावा लागतोय, कित्येक तास त्यांनी प्रतिक्षा करावी लागत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

Gautami Patil : सगळं काही असूनही खूश नाही…गौतमी पाटील असं का म्हणाली?

नागरिकांसाठी दस्त नोंदणी कार्यालयात चांगल्या सुविधा देखील नाहीत. तिरुपती बालाजी देवस्थानसारखे कूपन सिस्टिम चालू केल्यास ठरलेल्या वेळी लोक येतील व ठराविक काळात त्यांची कामे होतील, अशी यंत्रणा सरकारने करायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केलीय.

दरम्यान, शासनाने यासंदर्भात ठोस पाऊले उचलून राज्यातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणीही त्यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

Tags

follow us