“श्रीरामाने प्रामाणिकपणे सत्याचा मार्ग अवलंबला, संधीसाधू, पाठीत खंजीर खुपसणारे… ” अयोध्यावारीवरून सिब्बल यांचा शिंदेंना टोला
Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांसोबत अयोध्या दौऱ्यावर गेले होते. या अयोध्या दौऱ्यावरून शिंदे गटावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते आहे.
याच मुद्द्यावरून जेष्ठ वकील आणि ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात बाजू मांडणाऱ्या कपिल सिब्बल यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. सिब्बल यांनी आपल्या सोशल मीडियावरून एक पोस्ट लिहीत ही टीका केली आहे.
Ghungaru Teaser: सबसे कातील गौतमी पाटीलच्या ‘घुंगरु’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित
सिब्बल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहले आहे की, “प्रभू श्रीराम यांनी त्याग, प्रामाणिकपणा आणि सत्याचा मार्ग अवलंबला. बाळासाहेब ठाकरेंनीही हेच गुण आत्मसात केले. षडयंत्र रचणारे, संधीसाधू आणि पाठीत खंजीर खुपसणारे हा वारसा पुढे नेऊ शकत नाही.”
Shinde in Ayodhya:
Lord Ram chose:
Sacrifice
The path of Truth
RectitudeBalasaheb also imbibed those attributes
Conspirators
Opportunists
BackstabbersCannot carry forward the legacy of Balasaheb
— Kapil Sibal (@KapilSibal) April 10, 2023
दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यावरून सर्वच विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही याच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणले की शिंदे गटाचा दर्शनापेक्षा शक्ती प्रदर्शनाचा विषय जास्त होता. आम्ही सुद्धा या आधी दर्शन घेतलेल आहे आणि त्यावेळी कालची टोळी देखील होती. पण आम्ही शक्ती प्रदर्शन केले नाही.
ते पुढे म्हणाले की ज्या रामाची आपण पूजा केली त्या रामाने वनवासात जाताना आपला भाऊ भरत याला राज्य दिलं आणि राज्य चालवताना भरतानं रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून आपला संयम आणि मर्यादा पुरुषोत्तम रामाचे विचार अंमलात आणले. हा विचार किती लोकांना पटतो आणि पटला आहे मला माहित नाही, असे म्हणत त्यांनी शिंदेना टोला लगावला.