Sanjay Raut : श्रध्दा असेल तर अयोध्येत गेलं पाहिजे, शिंदेंकडून राजकीय शक्तीप्रदर्शन करण्यासाठी यंत्रणेचा वापर
Sanjay Raut On Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रि आणि आमदारांसोबत अयोध्या दौरा केला. या दौऱ्यावरून गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गटावर विरोधकांकडून टीकास्त्र डागलं जातं आहे. तर शिंदे गटाकडूनही विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं जातं आहे. ठाकरे गटासह राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनीही या दौऱ्यावरून शिंदे गटाला सुनावलं होतं. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महत्वाचं काय, शेतकऱ्यांचे प्रश्न की, अयोध्या दौरा? असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फटकारलं होतं. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनीही या दौऱ्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकेचे बाण सोडले. राजकीय शक्तीप्रदर्शन यंत्रणेचा वापर होतो आहे, असं राऊत म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. मागील महिन्यात अवकाळी पावसाने राज्याला झोडपून काढलं होतं. त्यानंतर काही भागात पंचनामे करण्यात आले होते. मात्र, अद्यापही बळीराजा मदतीपासून वंचित आहे. अशातच मागील दोन दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात अवकाळी पाऊस झाला. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अख्खं मंत्रिमंडळासोबत अयोध्या दौऱ्यावर गेले. यावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली. संजय राऊत यांनी सांगितले की, राज्यात अवकाळी पावसाने शेती पिकांचं मोठ नुकसान झालं. राज्याच्या विदर्भ, कोकण, मराठडावाड, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या बहुंताश भागात अवकाळी पावसाने हाहाकार निर्माण झाला आहे. गहु, द्राक्ष, भाज्या-फळे सगळं काही उद्धस्त झाले आहेत. असं असतांना सरकारचे लोक गेल्या दोन दिवसांपासून अयोध्येमध्ये आहेत. श्रध्दा असेल तर अयोध्येमध्ये असायला हरकत नाही. काल सत्ताधारी पक्षाचे आमदार हे अयोध्येला गेले आणि तिथं त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं. फक्त राजकीय शक्तीप्रदर्शन करण्यासाठी तुम्ही यंत्रणा वापरत आहात, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.
बीबीसी सरकारी अनुदानित मीडिया? ट्विटरच्या लेबलने चर्चांना उधाण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. शिंदे-फडणवीस यांच्या या अयोध्या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्ला केला आहे. अयोध्येत जायला हरकत नाही. पण श्रद्धा असेल तरच गेले पाहिजे. काल हे लोक तिथे गेले. आणि त्यांनी अयोध्येमध्ये शक्तीप्रदर्शन केलं. त्यांना शक्तीप्रदर्शनच करायचं होतं तर अयोध्येत जाण्याची गरज नाही. ठाण्याचा नाका आहे ना. तिथे करा शक्तीप्रदर्शन, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते मीडियाशी बोलत होते.
राऊत म्हणाले, सरकारमधील लोक हे शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाहीत. मुख्यमंत्री सांगतात की, मी पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ह्या गोष्टी त्यांच्या दिल्लीतील बॉसला सांगाव्या. शेतकऱ्यांना सांगू नका, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नका. शेतकरी अत्यंत खवळलेला आहे, असा इशारा दिला शिंदे गटातील काही आमदार हे अयोध्या दौऱ्यावर गेले नाहीत, या संदर्भात राऊत म्हणाले की, माझ्या कानावर आलं की, एक आमदारांचा गट अयोध्येला गेला नाही. एक गट अस्वस्थ आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येऊन नऊ महिने झाले आहेत. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तर झाला नाही. याविषयी राऊत म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार हे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहेत. अशात मंत्रिमंडळविस्तार केला आणि नाराज आमदारांना मंत्रिपदे मिळाले नाही, तर ते पक्षातून बाहेर पडू शकतात. परिणामी, सरकार अल्पमतात येऊ शकतं. त्यामुळं हे सरकार मंत्रिमंडळमंत्रिमंडळ विस्तार करणार नाही.
राऊत म्हणाले की, देशात महागाई, बेरोजगार हा ज्वलंत मुद्दे आहेत. घटनात्मक पदांवर बसलेल्या नेत्यांकडे डिग्री असायलाच पाहिजे, असा नियम नाही. त्याने काही फरक पडत नाही. पण, ज्यांच्याकडे डिग्री आहे, असं म्हटलं जातं, त्यांच्याकडे खऱी डिग्री असावी. नाहीतर विद्यापीठ हे डिग्रीची दुकानं होतील. पंतप्रधान मोदींनी आपली डिग्री दाखवली पाहिजे. अमित शहा यांनी मोदींची डिग्री दाखवली. पण, त्या डिग्रीवर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यामुळं आता भाजपने एकदा स्पष्ट करावं, ही डिग्री खरी आहे की, खोटं. कारण, मोदी म्हणतात, मी विश्वविद्यालयात गेलो नाही. मी फारसं शिकलो नाही. मग ही डिग्री आली तरी कुठून, असा सवाल राऊत यांनी केला.