Download App

भुजबळ, वळसे पाटील, पटेल हे…; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

  • Written By: Last Updated:

MNS Raj Thackeray :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या शिवतीर्थ या निवास स्थानावरुन पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर भाष्य केले. राज्यामध्ये कोणालाही मतदारांशी काही देणं घेणं नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. तसेच यावेळी त्यांनी सुप्रीय सुळे या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री झाल्यास आश्चर्य वाटणार नसल्याचे म्हटले.

राज ठाकरे म्हणाले की,  कोणालाही मतदारांशी काही देणं घेणं नाही. पक्षाचे कट्टर मतदार होते, याचा सर्वाना विसर पडला आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी वाटेल त्या तडजोडी करायचं हे पेव फुटलं आहे. मला वाटतं लोकांनी याचा गांभीर्याने विचार करण्याचा गरज आहे. लवकरच मेळावा घेणार आहे. तसेच, महाराष्ट्र दौराही सुरु करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

https://letsupp.com/maharashtra/ncp-political-crises-ajit-pawar-sharad-pawar-maharashtra-politics-update-63601.html

तसेच  या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं शरद पवार सांगत असले तरी, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे पवारांनी पाठवल्याशिवाय जाणार नाही. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही. याची सुरुवात पहाटेच्या शपथविधीनंतर झाली. शत्रू कोण मित्र कोण कळत नाही, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

राजकारणात येऊन चूक केलीय.., अजितदादांच्या बंडावर रोहित पवार भावनिक

दरम्यान,या घटनेवर राज ठाकरेंनी काल पोस्ट केली होती. त्यात राज ठाकरेंनी राष्ट्रवादीची एक टीम पुढे गेली असून दुसरी टीम काही वेळानंतर जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली.

Tags

follow us