Download App

‘लायकी नाही तरीही टीका करता…’, मनसेकडून कृपाशंकर सिंह यांना प्रत्युत्तर

MNS On Kripashankar Singh : राज ठाकरे काय बोलतात, हे त्यांनाच लक्षात राहत नाही. ते मनसैनिकांना काहीतरी करायला सांगतात

  • Written By: Last Updated:

MNS On Kripashankar Singh : राज ठाकरे काय बोलतात, हे त्यांनाच लक्षात राहत नाही. ते मनसैनिकांना काहीतरी करायला सांगतात, पण स्वतः वेगळंच करतात. सकाळी उठल्यावर भांग घेतात, म्हणूनच त्यांचं बोलणं विसरतात, अशी घणाघाती टीका भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी राज ठाकरेंवर (Raj Thackeray) केली आहे. राज ठाकरे यांनी गंगा नदीच्या प्रदूषणावरून केंद्र सरकारला लक्ष्य केल्यानंतर कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. “राज ठाकरेंना काही गोष्टी समजायला वेळ लागतो. आज ते काय बोलतात आणि उद्या काय बोलणार आहेत, हे त्यांनाही माहीत नसतं. मला वाटतं, ते सकाळी उठून भांग घेतात आणि मग काहीही बरळतात,” असे सिंह म्हणाले. तर आता मनसेकडून भाजप (BJP) नेते कृपाशंकर सिंह यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

मनसेचा संतप्त प्रतिसाद – “कानाखाली आवाज जाईल!”

कृपाशंकर सिंह यांच्या या टीकेवर मनसेने तुफान पलटवार केला आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी सिंह यांना थेट इशारा देत म्हटले की, “तुमची लायकी नाही, तरीही तुम्ही राज ठाकरे साहेबांवर वैयक्तिक टीका करता. जर कोणीही त्यांच्यावर अशा प्रकारची टीका केली, तर त्याच्या कानाखाली आवाज निघेल!” यासोबतच खोपकर यांनी कृपाशंकर सिंह यांची राजकीय कारकीर्दही लक्षात आणून दिली. “आज एका पक्षात, तर उद्या दुसऱ्या पक्षात फिरणारे ते राजकारणातील फेरीवाले आहेत. त्यांचं मत गंभीरपणे घेण्याची गरज नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

धक्कादायक, पुण्यात महिलेकडून अफूची शेती, पोलिसांची थेट शेतात धाड अन्…

भाजप-मनसे संघर्ष शिगेला

या वादामुळे भाजप आणि मनसे यांच्यातील राजकीय तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. कृपाशंकर सिंह यांच्या विधानानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. काही ठिकाणी मनसैनिकांनी कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात निदर्शने केली. तर आता भाजपचे वरिष्ठ नेते या वादावर काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. तसेच, राज ठाकरे स्वतः यावर काय उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

follow us