“टोल टोल टनाटन”, गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंना खोचक टोला अन् इशाराही..

“टोल टोल टनाटन”, गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंना खोचक टोला अन् इशाराही..

Raj Thackeray : राज्यात आज होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह आहे. सर्वसामान्यांपासून राजकारणी, सेलिब्रिटी अन् खेळाडू सगळेच रंगांत न्हाऊन निघाले आहेत. यातच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “टन टनाटन टोल है भाई, टन टनाटन टोल. टोल के माल बोल भाई, टोल के माल बोल” अशा खोचक शब्दांत त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली. सदावर्ते यांच्या या टीकेवर मनसे नेते अमेय खोपकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले सदावर्ते

राज ठाकरेने एक गोष्ट लक्षात ठेवावी. आता तू यापुढे कोणत्याही परिस्थितीत वाद लावण्याच्या भानगडीत पडायचं नाही. भाषा स्वतंत्र आहे. प्रशासकीय भाषा वेगळी असू शकेल. पण भाषेवर कुणाचच बंधन असू शकत नाही. चिल्लेपिल्ले पोरं दुकानात जाऊन, व्यापाऱ्यांकडे जाऊन त्रास देत आहेत ना. ते आज होळीच्या या होळीच्या निमित्ताने जाळून टाका. प्रांतवाद जाळून टाका. भाषावाद करू नका. राज ठाकरे आता तु्म्ही एक करा. टोल टोल टनाटन. टोल के उपर गिनो भाई. राज ठाकरे लक्षात ठेवा भाषेच्या आधारावर आपली पोळी शेकू नका.

पाकिस्तानात पाठवायचा भारतीय शस्त्रास्त्रांची गुप्त माहीती; आयएसआयचा गुप्तहेर युपी एटीएसच्या ताब्यात

यानंतर मनसे नेते अमेय खोपकर यांनी सदावर्ते यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. कोण गुणरत्न सदावर्ते? कर्जतमधून बोलतात की कसाऱ्यावरून? त्यांच्यामागे बुजगावणं उभं असतं. बुगूबुगू करणारा एक प्राणी उभा असतो. हीच त्यांची पात्रता आहे. ह्यांची लायकी काय आहे. महाराष्ट्रासाठी ह्यांनी नेमकं केलं काय आजच कशाला राजकारण करताय असे सवाल उपस्थित करत रंगाचा बेरंग करू नका असा सल्ला खोपकर यांनी गुणरत्न सदावर्ते यांना दिला आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube