Download App

ही तर विश्वभगिनी; प्रत्युत्तर देत मनसेने उडवली अंधारेंची खिल्ली

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या पत्राला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खरमरीत प्रत्युत्तर देण्यात आलंय. उष्माघाताच्या दुर्घटनेप्रकरणी सुषमा अंधारेंनी पत्र लिहितं राज ठाकरेंच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते. त्यावर आता एका मनसैनिकाने सुषमा अंधारेंना पत्र लिहित मार्मिक टोलेबाजी लगावलीय. विश्वभगिनी आपण जाणूनबुजून करुन घेतलला छोटासा गैरसमज दूर करण्याचा छोटासा प्रयत्न करत असल्याचं म्हणत मनसे नेते योगेश खैरे म्हणाले आहेत.

आधी राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न मार्गी लावा,मग दादा,आबांना प्रवेश द्या

योगेश खैरे पत्रात म्हणतात, “आपलं तथाकथित खरमरीत पत्र वाचायला मिळालं. त्यामुळे आपण जाणूनबुजून करून घेतलेला गैरसमज दूर करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. मला खात्री आहे तो दूर होणार नाही तरीही हा प्रयत्न गोड मानून घ्यावा…!

आपण खरंतर अतिशय सजग उपनेत्या आहात. तरीही आपल्याला राजसाहेब ठाकरेंनी चार दिवसांनंतर नव्हे तर या दुर्घटनेच्या दुसऱ्याचं दिवशी खारघर दुर्दैवी घटनेसंदर्भात सर्वांनाच कसं सुनावलं होतं हे ऐकू आलं नाही हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. असो, तरीही इंटरनेटचं जग असल्याने आपल्याला ती पत्रकार परिषद आपल्याला व्यस्त कामातून वेळ मिळाला तर पुन्हा इंटरनेटद्वारे पाहता येईल. आणि बऱ्याच बाबींची उकल आपल्याला होणार असल्याचा विश्वास खैरेंनी पत्राच्या माध्यमातून व्यक्त केलाय.

K L Rahul: केएल राहुलची फलंदाजी ढेपाळली, आकडेवारी बघून बसेल तुम्हाला धक्का!

कुठल्याही दुर्दैवी अपघाती किंवा निसर्गनिर्मित घटनेचं राजकारण करणं योग्य नाही असा राजसाहेबांच्या सांगण्याचा उद्देश होता. योग्य आकलन केलंत तर नक्की आपल्या सारख्या सुज्ञ व्यक्तीच्या ते लक्षात येईल. कोरोना काळात लोकांचा जीव जात असताना कुठं कुठं कसा भ्रष्टाचार होत होता, कोविड सेंटरची कंत्राटं कुणाला कशी दिली गेली याची माहिती नक्की मातोश्रीतून घ्यावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी अंधारेंना दिला आहे.

तसेच उन्हात, एवढ्या लोकांना न बोलवता कार्यक्रम सभागृहात करता आला असता हे राजसाहेबांनी दुसऱ्या दिवशीच सांगितलं होतं. कदाचित आपण सोईस्करपणे ऐकलं नसेल. शिंदे-फडणवीस सरकारने राजकीय उद्देश ठेवून तो कार्यक्रम केला असं आपल्याला वाटतं, म्हणून आम्हीही त्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेचा राजकारणासाठी उपयोग करणार असा आपल्या म्हणण्याचा अर्थ दिसत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

काश्मिरमध्ये सैन्याच्या वाहनाला आग, दुर्घटनेत 5 जवान शहीद; नेमकी कशी लागली आग?

उष्माघात दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवशी राजसाहेब श्री सदस्यांची विचारपूस करायला पोहचले होते ही तातडीची भेट वाटत नसेल तर दुर्दैव आहे. याला राजकारण करणं म्हणतात, असंही ते म्हणाले आहेत. कोरोना काळात सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रात वाढत असताना हा कसला पॅटर्न होता हे कळायला काही मार्ग नाही. असो, असं म्हणत योगेश खैरेंनी पत्राद्वारे सुषमा अंधारेंना मार्मिक टोलेबाजी केलीय.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारकडून आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यासाठी खारघरच्या खुल्या मैदानात जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यभरातून अनेक श्री सदस्य दाखल झाले होते. याचवेळी उष्माघाताचा त्रास झाल्याने एकूण 14 जणांना जीव गमवावा लागला. त्यावरुन आता विरोधकांकडून सत्ताधारी सरकारवर टीका सुरु आहे.

Tags

follow us