काश्मिरमध्ये सैन्याच्या वाहनाला आग, दुर्घटनेत 5 जवान शहीद; नेमकी कशी लागली आग?

Untitled Design   2023 04 20T220228.821

terrorist attack in jammu and kashmir today : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या (Indian Army) वाहनाला आग लागल्याने पाच जवान शहीद झाले. प्रत्यक्षात त्या वाहनावर अतिरेकी हल्ला (terrorist attack) झाला होता. संध्याकाळी उशिरा या घटनेबाबत लष्कराकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात लष्कराच्या वाहनावर अतिरेकी हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. मुसळधार पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फायदा घेत अज्ञात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर गोळीबार केल्याचे लष्कराने म्हटले आहे. यात पाच जवान शहीद झाले असून एक जवान जखमी झाला आहे.

PAFF या दहशतवादी संघटनेने स्विकारली जबाबदारी
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो हे भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याची बातमी समोर येताच काश्मिरमध्ये अतिरेक्यांनी भारतीय जवानांच्या ताफ्यावर गोळीबार केला. दरम्यान, या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट PAFF (PAFF) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. PAFF ही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे सुधारित रूप आहे. ज्यांनी यापूर्वीही अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास पूंछ जिल्ह्यातील भटादुरिया भागात लष्कराच्या वाहनाला आग लागली. ही आग कोणत्या कारणाने लागली याचं अधिकृत कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र, संरक्षण दुलाच्या सुत्रांनसार, या वाहनाला दहशतवाद्यांनी फेकलेल्या ग्रेनेडमुळे गाडीला आग लागल्याचा संशय आहे. यामध्ये पाच जवान शहीद झाले असून एक जवान जखमी झाला आहे. त्यानंतर संपूर्ण परिसराला घेराव घालून शोधमोहीम राबवण्यात आली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लष्कर आणि पोलिसांच्या पथकांनी संपूर्ण परिसराला घेराव घालून शोधमोहीम राबवली. त्यानंतर सायंकाळी लष्कराकडून निवेदन देण्यात आले आहे.

पृश्वीराज चव्हाणांनी केला फडणवीसांचा व्हिडिओ लाईक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

यामध्ये लष्कराच्या वतीने सांगण्यात आले की, लष्कराचे आरआर वाहन भीमबेर गलीहून पुंछच्या दिशेने जात होते. तीन वाजण्याच्या सुमारास या परिसरात त्याच्यावर दहशतवादी हल्ला झाला. मुसळधार पावसाचा फायदा घेत दहशतवाद्यांनी वाहनावर गोळीबार केला. त्यानंतर ग्रेनेडही फेकण्यात आले. त्यामुळे सैनिकांना सावरण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे गाडीने पेट घेतला आणि वाहनात उपस्थित सहा जवानांना याचा फटका बसला. यामध्ये पाच जण जागीच शहीद झाले. एका जखमीला उपचारासाठी राजौरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या हल्ल्याबाबात देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे

दरम्यान, आता या अतिरेकी हल्ल्यातील अतिरेक्यांचा सुरक्षा दलाकडून शोध घेण्यात येत असून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. आहे.

Tags

follow us