Download App

Monsoon Update : बळीराजाला दिलासा! येत्या 48 तासांत राज्यात मान्सूनचं आगमन होणार; हवामान विभागाची माहिती

Monsoon Update : केरळमध्ये मान्सूनचं ( Monsoon) आगमन झाल्यानंतर आता महाराष्ट्र देखील मान्सूनच्या ( Monsoon) प्रतिक्षेत आहे. त्यामध्ये आता हवामान विभागाने (IMD) राज्याला दिलासा देणारी माहिती दिली आहे. त्यामुळे यावर्षी उशीराने आगमन होत असलेल्या मान्सूनच्या ( Monsoon) वाटेकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला ही आनंदाची बातमी मिळाली आहे. ( Monsoon arrive in 48 hours Says Meteorological department )

Monsoon Update : मान्सूनच्या आगमनाबरोबर दुष्काळाचंही सावट; El-Nino सक्रिय झाल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ

येत्या 48 तासांत केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रतील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात मान्सूनच आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान शुक्रवारी देखील राज्यात कोकणासह काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.

त्यानंतर आता येत्या 48 तासांत मान्सून गोव्याच्या किनारपट्टीसह महाराष्ट्रात दाखल धडकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्र आणि गोव्याच्या काही भागात पावसाच आगमन होणार आहे. कारण नैऋत्या मान्सून आज पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटकातील कारवारपर्यंत पुढे सरकला आहे. गोव्यासह महाराष्ट्रात किनारपट्टीकडे सरकत आहे. अशी माहीती हवामान विभागाचे पुणे विभाग प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिली आहे.

Monsoon : आला रे पाऊस आला! प्रतिक्षेनंतर अखेर केरळात मान्सून दाखल…

दरम्यानच आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. एल निनो ( El-Nino) सक्रिय झाल्याने मान्सूनच्या आगमनाबरोबर दुष्काळाचंही सावट देखील पडलं आहे. यावर्षी एल-निनोच्या प्रभावामुळे भारतात दुष्काळाची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेच्या नोआ ( National Oceanic and Atmospheric Administration) या संस्थेने ही माहिती दिली आहे. त्यामुळे अगोदरचं मान्सूनचं आगमन उशीरा झालं त्यात आता दुष्काळाचंही सावट घोंगार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Tags

follow us