Monsoon Update : मान्सूनच्या आगमनाबरोबर दुष्काळाचंही सावट; El-Nino सक्रिय झाल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ
Monsoon Update : देशासह राज्यभरात उकाड्याने लाहीलाही होत असतानाच नुकतच केरळमध्ये (Kerala) मान्सूनचं (Monsoon) आगमन झालं आहे. काही दिवसांपासून अरबी समुद्रात (Arabian Sea) घोंगावत असलेलं ‘बिपरजॉय’ (Biperjoy) चक्रीवादळामुळे 16 जूननंतर मान्सूनचं (Monsoon) आगमन होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण आता हवामानात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे 8 दिवस उशीराने का होईना देशात मान्सूनचं (Monsoon) आगमन झालं राज्यात मात्र अद्यापही मान्सूनची प्रतिक्षा कायम आहे. तर या दरम्यानच आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. एल निनो ( El-Nino) सक्रिय झाल्याने मान्सूनच्या आगमनाबरोबर दुष्काळाचंही सावट देखील पडलं आहे. ( Monsoon Arrived but Fear of Drought this year due to El-Nino )
Monsoon : आला रे पाऊस आला! प्रतिक्षेनंतर अखेर केरळात मान्सून दाखल…
यावर्षी एल-निनोच्या प्रभावामुळे भारतात दुष्काळाची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेच्या नोआ ( National Oceanic and Atmospheric Administration) या संस्थेने ही माहिती दिली आहे. त्यामुळे अगोदरचं मान्सूनचं आगमन उशीरा झालं त्यात आता दुष्काळाचंही सावट घोंगार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
Monsoon Rain : केरळात आजच, महाराष्ट्रात 10 जूनला मान्सून धडकणार!
एल-निनो च्या प्रभावामुळे भारतीय पावसाला मोठा फटका बसतो. तर दर 3-6 वर्षांनी हा एल निनोचा प्रभाव पडत असल्याने त्या-त्या वर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस होतो अशा गेल्या काही वर्षांतील नोंदींवरून दिसून येत. याअगोगर 2018 ला एल निनोचा प्रभाव होता. त्यामुळे पावसावर परिणाम झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा एल-निनो सक्रिय झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 15 जुलै किंवा 1 ऑगस्टनंतर पावसाला ओढ बसण्याची शक्यता आहे. तसेच त्यामुळे दुष्काळाचे सावट, पाणी टंचाई, नापिकी अशा समस्यांचा सामना कारावा लागू शकतो. असं देखील सांगण्यात येत आहे.
दरम्यान महाराष्ट्रामध्ये कमाल तापमानातच नाही तर किमान तापमानामध्येही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे उकाडा वाढत आहे. घामांच्या धारा वाहायला लागल्या आहेत. राज्यभरात उकाडा वाढला असतानाच काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लावली आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून लवकरच दाखल होईल. मात्र उन्हाचा तडाखा कमी होण्याची चिन्ह काही दिसत नाहीत. महाराष्ट्रात साधारण 10 जून रोजी मान्सून दाखल होईल. यंदा राज्यात एकूण सरासरीच्या 95 टक्के पाऊस होईल. तसेच जून आणि जुलै या दोन महिन्यांत कमी पाऊस तर ऑगस्ट महिन्यात साधारण पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.