Monsoon Update: भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनचा (Monsoon) अंदाज जाहीर केला. यंदा मान्सून सामान्यच राहणार असून जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जूनमध्ये देशात 104 मिमी पाऊस पडेल, भारतीय समुद्री स्थिरांक सकारात्मक असल्याने अलं निनोचा धोका नाही, अशी माहिती दिल्ली येथील हवामान विभागाचे विभाग प्रमुख डॉ. डी. एस. पै यांनी दिली.
डॉ. डी. एस. पै यांनी सांगितले की, अरबी समुद्राकडे बाष्पयुक्त वार्यांचा वेग वाढल्याने मान्सून ४ जूनच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होणे अपेक्षित आहे. तर महाराष्ट्रातील तळकोकणात ७ जून रोजी मान्सून येऊ शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तसंच भारतीय समुद्री स्थिरांक (आयओडी) मान्सूनला अनुकूल असल्याने जूनमध्ये पाऊस चांगला (164 मिलीमीटर) होईल, असाही अंदाज आहे.
There is no cyclone probability in the Arabian sea for next week. If rainfall distribution is almost similar everywhere, then it will be an ideal situation. There won't be any problem. If we get equal distribution everywhere, there won't be much impact on agriculture. In…
— ANI (@ANI) May 26, 2023
डॉ डी. एस. पै म्हणाले, मान्सून सध्या निकोबार बेटावर आहे.आमच्या अंदाजाप्रमाणे तो 4 जूनला अपेक्षित आहे.स कारात्मक वातावरण तयार झाले तर तो लवकरही येण्याची शक्यता आहे. तसेच देशात यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान 96 टक्के पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.