शेतकऱ्यांनो, मुंबईसह महाराष्ट्रात ‘या’ दिवशी दाखल होणार मान्सून; जाणून घ्या सर्वकाही

Maharashtra Monsoon Updates :  देशात मान्सूनची सुरुवात झाली असून केरळसह काही राज्यात जोरदार पाऊस होताना दिसत आहे. तर दुसरीकडे

Maharashtra Monsoon Updates

Maharashtra Monsoon Updates

Maharashtra Monsoon Updates :  देशात मान्सूनची सुरुवात झाली असून केरळसह काही राज्यात जोरदार पाऊस होताना दिसत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास मंदावला असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर सामान्य नागरिक देखील उकाड्याने त्रस्त आहेत. त्यामुळे राज्यात मान्सून कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना हवामान विभागाकडून राज्यातील मान्सूनबाबत नवीन माहिती देण्यात आली आहे.

हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरात (Pacific Ocean) एलनिनो (El Nino) सक्रिय झाल्याने त्याचा परिणाम भारत आणि राज्यातील मान्सूनवर (Maharashtra Monsoon Updates) मोठ्या प्रमाणात होत आहे. एल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे मान्सूनच्या प्रवाहात अडथळे येत असल्याने राज्यात मान्सूनसाठी अजून देखील काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. देशात एल निनो सक्रिय झाल्याने भारतात यंदा सरासरीच्या 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.

20 जून रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह (Mumbai) संपूर्ण राज्यात 20 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरातील एल निनो चा प्रभाव व अफगाणिस्तानकडून येणाऱ्या गरम व कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनची वाटचाल थांबली आहे. या कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला की मान्सूनच्या पुढील प्रवासाला सुरुवात होणार असून 20 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

FIFA World Cup ब्राझील मोरोक्को सामना ड्रॉ अन् हाय-व्होल्टेज VAR वाद

मान्सून दाखल होण्यात काही अडचण निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या करण्यासाठी घाई करु नये असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version