Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, तत्काळ मदत देणार

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, तत्काळ मदत देणार

Devendra Fadnavis : गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) पुन्हा धुमाकुळ घातला आहे. गारपीट आणि वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या (Amravati) दौऱ्यावर आले असता त्यांनी गारपीट आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचनामे पूर्ण होताच तत्काळ शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यात येईल, असे अश्वासन दिले.

जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या बैठकांनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 3 हजार 245 हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले असून आणखी 4 हजार हेक्टरचे पंचनामे लवकरच पूर्ण होतील. त्यानंतर या शेतकर्‍यांना तत्काळ शासनातर्फे मदत दिली जाईल. सातत्याने शेतकर्‍यांची तक्रार होती की, केवळ 65 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला तरच मदत मिळते. त्यामुळे ‘सततचा पाऊस’ हा नवा निकष तयार करण्यात आला आणि त्याची सुद्धा नुकसानभरपाई देण्याचा निर्णय गेल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

उष्माघात ठरू शकतो जीवघेणा, बचावासाठी हे उपाय जाणून घ्या

अमरावती विभागात तीन वेळा अशी आपत्ती आली आहे. त्यांना निश्चितपणे मदत मिळेल. गारपीटग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठिशी राज्य सरकार ठामपणे उभे राहील, असे फडणवीस यांनी सांगितले.

काल अकोला जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेडवर झाड पडून घडलेल्या घटनेत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 35 जखमी झाले. मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यासंबंधीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. जखमींवर उपचारांचा खर्च करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक : राहुल गांधी प्रकरणावरुन मांडणार… 

राज्यात नवीन वाळू धोरण तयार झाले आहे. वाळूमाफियांना यामुळे चाप बसणार आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एलनिनोसारखी परिस्थिती उदभवली तर काय उपाययोजना करायच्या, यासाठी शासनाने आधीच एक समिती गठीत केली आहे. त्यामुळे तशी स्थिती उदभवल्यास कोणत्या उपाययोजना करायच्या, यादृष्टीने शासनाने आधीपासूनच तयारी प्रारंभ केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube