उष्माघात ठरू शकतो जीवघेणा, बचावासाठी हे उपाय जाणून घ्या

उष्माघात ठरू शकतो जीवघेणा, बचावासाठी हे उपाय जाणून घ्या

Avoid Heat Stroke : उन्हाळा सुरु झाला असून तापमानाचा पारा देखील वाढू लागला आहे. दरम्यान एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उन्हाचा तडाखा हा जास्तच असतो. उन्हाळा म्हंटले की आजारांना देखील निमंत्रण हे मिळतच असते. यातच तीव्र उन्हामुळे उष्मघाताचा (Heat stroke) देखील धोका हा निर्माण होत असतो. उष्मघात हा जीवघेणा देखील ठरू शकतो म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही बचावात्मक उपाय सांगणार आहोत. हिट स्ट्रोक टाळण्यासाठी आहारात काय बदल करावा तसेच काय खावे? आहार कसा असावा याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

कांदा : उष्माघातापासून बचाव करण्यासाठी कांदा देखील प्रभावी ठरतो. कांद्याचा रस याचा उल्लेख आयुर्वेदात देखील करण्यात आला आहे. उष्माघातावर कांद्याचा रस फायदेशीर ठरतो. उष्माघातापासून रक्षण करण्यासाठी रोज एक चमचा कांद्याचा रस मधासोबत घ्यावा. यामुळे उष्माघातापासून बचाव होण्यास मदत होते.

चिंच :उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास तुम्ही तात्काळ चिंचेचा रस घेणे गरजेचे आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्ही एक किंवा दोन ग्लास पाण्यात चिंचेचे दोन तुकडे उकळून घ्या. त्यांनतर या मिश्रणात थोडी साखर, मध व त्यानंतर थोडं लिंबू पिळा. हे पाणी रोज घेतल्याने डिहायड्रेशनमुळे शरीरात कमी झालेली पोषकतत्वे भरून निघण्यास मदत होते. तसेच दररोज ताक, लस्सी पियाल्याने उष्माघातापासून स्वत:चे रक्षण करता येते.

महाडिकांनी रडीचा डाव खेळायला नको होता; सतेज पाटलांचा हल्लाबोल

‘या’ पदार्थांचे सेवन : उन्हाळ्यात अंगातील पाणी कमी होऊन तुम्ही डिहायड्रेशनच्या समस्याला बळी पडू शकतात . यासाठी या काळात अशा पदार्थांचे सेवन करणे चांगले मानले जाते, ज्याचा थंड प्रभाव पडतो. काकडी, कलिंगडयांसह अश्या अनेक थंड पदार्थांचे सेवन करून तुम्ही स्वतःला थंड ठेवू शकता.

भावना गवळी अन हेमंत पाटलांच वाढलं टेन्शन.. ‘या’ माजी खासदाराने निवडणूक लढवण्याची केली घोषणा

पुदीना : आयुर्वेदात पुदिन्याच्या पानाचे अनेक फायदे सांगितले आहे. त्याचबरोबर पुदिन्याची पाने उन्हाळ्यात उष्मघातापासून देखील बचाव करतात. पुदिन्याची ताजी पाने खाल्ल्याने उष्माघातापासून आराम मिळू शकतो. यामध्ये असलेले मेन्थॉल शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. यासोबतच उष्माघातापासूनही बचाव होतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube