Download App

खासदार अमोल कोल्हे म्हणाले… मी सर्वांची माफी मागतो, काय आहे प्रकरण?

मुंबई : शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कोल्हे हे आपल्या एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहे. कोल्हे यांनी घाई गडबडीत आणि अनावधानानं बेळगावचा बेळगावी असा उल्लेख केला. याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करत जाहीर माफी देखील मागितली आहे. तसेच बेळगावमधील राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून या कार्यक्रमाला देखील डॉ. कोल्हे उपस्थित राहणार नाही आहे. याची माहिती खुद्द कोल्हे यांनी दिली आहे.

कोल्हे यांनी ट्विटमध्ये म्हंटले…
बेळगाव येथील राजहंसगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास मी तमाम सीमावासीय मराठी बांधवांच्या भावनांचा आदर करून उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.
मी सदैव सीमावासीय मराठी बांधवांसोबत सोबत होतो, आहे व राहीन!
#बेळगाव #मराठी #महाराष्ट्र #जय_शिवराय

कोल्हेंनी सांगितले न जाण्याचे कारण
येत्या पाच तारखेला बेळगावच्या राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण आहे. या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित करण्यात आलं होत. अनावधानाने या प्रोगॅमसंदर्भात भाष्य करत असताना, बेळगावचा माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.

संपत्ती वादावर अभिनेता नवाजुद्दीनने उचलले मोठे पाऊल, कोट्यवधींची जमीन…

या कार्यक्रमाबाबत सीमाभागातील माझ्या अनेक मराठी बांधवांनी एकूण पार्श्वभूमीची कल्पना मला दिली. त्यामुळे तमाम सीमावासीय मराठी बांधवांच्या भावनांचा आदर करून मी सदर कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी सदैव सीमावासीय मराठी बांधवांसोबत सोबत होतो, आहे व राहीन.!

Tags

follow us