पंतप्रधान नरेंद्र मोदीही शरद पवारांच्या घरी जातात, ते कोणाला वाचवण्यासाठी येतात हे विचारा, असा खोचक सवाल करत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
शंभूराज देसाईंची ठाकरेंवर खोचक टीका : म्हणाले, काका मला वाचवा…
दरम्यान, उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटण्यासाठी सिल्वर ओक बंगल्यावर गेल्याने राज्यात सत्ताधारी विरोधकांमध्ये घमासान सुरु आहे. त्यावरुन देसाईंच्या टीकेला अरविंद सावंतांनी प्रत्युत्तर दिलंय.
सावंत पुढे बोलताना म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देशातले मोठे नेते आहेत. ते वयाने, अनुभवानेही मोठे नेते आहेत. त्यांनी भेटण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील येत असतात.
अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र… हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची केली मागणी
एवढंच नाहीतर त्यांच्या कार्यक्रमाला आणि सभांना मोदी येत असतात. त्यावेळी मोदी कोणाला वाचवण्यासाठी येतात हे विचारण्याचा सल्ला खासदार अरविंद सावंतांनी शंभूराज देसाईंना दिला आहे.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना कोणालाही विचारात घेतलं नव्हतं, असा खुलासा शरद पवारांनी केला. त्यानंतर
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवारांच्या सिल्वर ओक इथं गेले होते.
‘आधी बाळासाहेबांच्या नावाने दुकानदाऱ्या चालवल्या आता’.. शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
ठाकरे पवारांच्या भेटीस गेल्याने राजकीय वर्तुळात विरोधकांकडून टीका करण्यात आल्या आहेत. याच टीकांनी खासदार अरविंद सावंतांनी प्रत्युत्तर देत मोदी कोणाला वाचवण्यासाठी पवारांनी भेटण्यासाठी येतात? असा सवाल केला आहे.
तसेच उद्धव ठाकरे शरद पवारांच्या घरी गेले तर त्याकडे वेगळं बघण्याची गरज काय, म्हणत त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांनाही सुनावलं आहे. तुम्ही कोणाच्या दरवाज्यात पाय घालताय तेवढं पहा म्हणजे कळेल, अशा शब्दांत सुनावलं आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून महाविकास आघाडीत बिघाडी झाली काय? भविष्यात महाविकास एकत्र राहणार की फूट पडणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.