खासदार लंके यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा…रूबी हॉलमध्ये राजकीय नेत्यांच्या भेटी

विविध राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निकटवर्तीयांनी रूबी हॉल क्लिनिक येथे जाऊन खासदार लंके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Untitled Design 6 1

Untitled Design 6 1

MP Lanke’s health improves rapidly : विषाणूजन्य ताप आणि डिहायड्रेशनमुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नीलेश लंके यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त केली जात असताना आता उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे. रविवारी दिवसभर विविध राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निकटवर्तीयांनी रूबी हॉल क्लिनिक येथे जाऊन खासदार लंके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह नगर जिल्हा आणि राज्यातील अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची भेट घेत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. गेल्या गुरुवारी खा. लंके यांना प्रकृती अधिक बिघडल्याने पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सततचे दौरे, सामाजिक मोहिमा, लग्नसराईतील कार्यक्रम, अपुरी विश्रांती आणि शारीरिक थकवा यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.

एक वर्ष सोनं खरेदी थांबवलं तर काय होईल?; मोदींच्या आवाहनामुळे अर्थव्यवस्थेत मोठे बदल होण्याची चर्चा

तामीळनाडूतील जिंजी किल्ल्यावर राबविण्यात आलेल्या स्वच्छता व संवर्धन मोहिमेत सहभाग घेतल्यानंतर ते कोल्हापूर, नाशिक, संगमनेर आणि नगर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. प्रकृती अस्वस्थ असतानाही त्यांनी कार्यक्रम सुरूच ठेवले. याच धावपळीचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाल्याचे बोलले जात आहे. बी. रूबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना त्यांना विषाणूजन्य ताप आणि डिहायड्रेशनचा त्रास झाल्याचे स्पष्ट केले होते. अतिदक्षता विभागाच्या संचालक डॉ. प्राची साठे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.

सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांकडून देण्यात आली. डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असून पुढील काही दिवस सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version