Nishikant Dubey Criticize Raj Thackeray And Udhhav Thackeray : मीरारोड येथे मराठी (Marathi) न बोलणाऱ्या परप्रांतीय दुकानदारावर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. यामुळे राज्यभरात बहुतेक स्थानिक आणि हिंदी भाषिक समुदायांमध्ये वादाला तोंड फुटले होते. मनसेच्या (Raj Thackeray) आक्रमक भूमिकेनंतर हिंदीभाषकांनी ‘आम्ही मराठी बोलणार नाही’ असे ठसठशीत वक्तव्य केलं. अनेकांनी आम्हाला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा, असे कटू शब्द उच्चारले. भाजपचे (BJP) खासदार निशिकांत दुबे यांनी (Nishikant Dubey) या प्रकरणावर अप्रत्यक्षरित्या ट्वीट करून वाद आणखीनच वाढवला आहे.
छत्री घेवूनच बाहेर पडा! आज मुसळधार कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांच्या X अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा. ही पोस्ट त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांना टॅग केली आहे.
“हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा.”@RajThackeray @OfficeofUT @ShivSenaUBT_
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) July 6, 2025
मनसेला डिवचणारी पोस्ट
मराठीच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेणाऱ्यांना निशिकांत दुबे यांनी अप्रत्यक्षपणे ‘कुत्रा’ म्हणून संबोधलं आहे. खासदार निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर मनसेला डिवचणारी ही पोस्ट केली आहे. विशेष म्हणजे ही पोस्ट त्यांनी मराठी भाषेत लिहिली आहे. निशिकांत दुबे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन वाघ आणि कुत्रा तुलना केल्यामुळे हा वाद आणखीनच पेटणार असल्याचं दिसतंय. हे ट्विट करुन निशिकांत दुबे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेणाऱ्यांना एक प्रकारे खुलं आव्हान दिलंय.
धक्कादायक! रीलच्या नादात 17 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, भंडाऱ्यातील घटना
भाजप काय भूमिका घेणार?
यावर आता मनसे आणि ठाकरे गट नेमकी कोणती भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. निशिकांत दुबे वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आता त्यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रातील भाजप नेते कोणती भूमिका घेतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुबेंनी ठाकरे बंधूंची तुलना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम अन् मसूद अजहर यांच्याशी केलीय. त्यांनी याअगोदर मुंबईतील मराठी-हिंदी वादाची तुलना काश्मिरी पंडितांच्या समस्येशी केली होती.